ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच भेटले सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल, काही तास राहिले सोबत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 06:48 PM2022-01-29T18:48:17+5:302022-01-29T18:51:26+5:30

Sushmita Sen : आता बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, असं  सांगितलं जात आहे की, ब्रेकअपच्या घोषणेच्या एक महिन्यानंतर दोघे पहिल्यांदा भेटले.

Sushmita Sen Rohman Shawl meet after breakup says report | ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच भेटले सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल, काही तास राहिले सोबत!

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच भेटले सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल, काही तास राहिले सोबत!

googlenewsNext

आता एक महिन्याहून जास्त काळ झाला जेव्हा सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि रोहमन शॉल (Rohman Shawl) यांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली होती. दोघांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फॅन्सना ही माहिती दिली होती. यानंतर रोहमनने लव्ह आणि रिलेशनशिपवर पोस्ट शेअर केली होती. ज्यात फॅन्सने त्याला जीवनातील अडचणीच्या भागाबाबत प्रश्न विचारला होता. रोहमनने उत्तर दिलं होतं की, त्याला फक्त एका स्पेशल व्यक्तीच्या 'जादूच्या झप्पी'ने चांगलं वाटतं. कधीना कधी रोहमनने सुष्मिताचं नाव न घेता आपल्या मनातील बोलला होता.

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच भेटले

आता बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, असं  सांगितलं जात आहे की, ब्रेकअपच्या घोषणेच्या एक महिन्यानंतर दोघे पहिल्यांदा भेटले. न्यूज पोर्टलनुसार, दोघे वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटले. दोघे एकाच गाडीतून सोबत गेले. अभिनेत्रीच्या घरातून रोहमन एका कॉमन फ्रेन्डच्यासोबत निघाला. त्यासोबतच दोघे दोन तास बोलले. थोडावेळ अभिनेत्रीच्या घराच्या खाली वाट पाहिली, नंतर काही तासांसाठी तो अभिनेत्रीच्या घरी गेला.

सूत्रांनुसार, दोघांचं ब्रेकअप झालं आहे. पण आजही सुष्मिता आणि रोहमन यांच्यातील मैत्री कायम आहे. सुष्मिताच्या मुली अलीसाह आणि रेनेसोबत त्याचं खास बॉन्डींग आहे. दोघींच्याही तो जवळ आहे. रोहमन दोघींसाठी वडिलांप्रमाणे आहे. सुष्मितालाही या बॉन्डपासून काही समस्या नाही. 

सुष्मिता सेनने ब्रेकअपबाबत सांगितलं होतं की, जेव्हा कुणी पब्लिक फिगर असतं तेव्हा त्याच्याशी संबंधित लोकही नजरेत येतात. ती व्यक्ती तिथे असते कारण तुम्ही त्याला तिथे घेऊन येत असता. त्यामुळे हे त्याच्या लाइफसोबत फेअर नाही. ना तुमच्यासोबत फेअर  आहे की, तुम्ही प्रत्येकाच्या फिलींगसोबत जुळून रहावं आणि विचार करावा की, हे रिलेशनशिप आहे.
 

Web Title: Sushmita Sen Rohman Shawl meet after breakup says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.