VIDEO : ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेन्डसोबत दिसली सुष्मिता सेन, गर्दीत त्याने घेतली अशी काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:02 IST2022-03-22T11:58:02+5:302022-03-22T12:02:08+5:30
Sushmita Sen : माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन नेहमीच तिच्या पर्सनल रिलेशनमुळे चर्चेत असते. इतक्या वर्षात सुष्मिताचं नाव अनेक लोकांसोबत जोडलं गेलं.

VIDEO : ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेन्डसोबत दिसली सुष्मिता सेन, गर्दीत त्याने घेतली अशी काळजी
अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आपल्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ती रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी खुलासा केला की, त्यांचं ब्रेकअप झालं आहे. या बातमी तिच्या फॅन्सना धक्का बसला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सुष्मिता आणि रोहमन सोबत दिले आहेत. यावेळी रोहमन सुष्मिताला गर्दीपासून वाचवताना दिसला.
माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन नेहमीच तिच्या पर्सनल रिलेशनमुळे चर्चेत असते. इतक्या वर्षात सुष्मिताचं नाव अनेक लोकांसोबत जोडलं गेलं. याचा तिने अनेक स्वीकारही केला. पण तिची नाती फार काळ टिकू शकली नाहीत. पुन्हा एकदा तेच झालं. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सुष्मिता सेन तिचा एक्स बॉयफ्रेन्ड रोहमन पॉलसोबत दिसली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिच्या फॅन्सच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
सुष्मिता सेनने एक्स बॉयफ्रेन्ड रोहमन पॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली होती. ती असंही म्हणाली होती की, ते चांगले मित्र बनून राहतील. अशात ब्रेकअपनंतर ही तिसरी वेळ आहे की, सुष्मिता एक्स बॉयफ्रेन्ड रोहमनसोबत दिसली. यावेळी हॉटेलबाहेर गर्दी जमल्यावर रोहमन तिची काळजी घेतानाही दिसला. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे दोघेही मॅचिंग कपडे घातलेले दिसले.