‘हे’ आहे सुश्मिता सेनचं पहिलं प्रेम, म्हणाली - तूच माझी नशीब आहेस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 05:10 PM2023-09-04T17:10:36+5:302023-09-04T17:12:37+5:30
सुश्मिताने फोटोसोबत रेनेसाठी एक प्रेमळ नोटही शेअर केली.
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची मोठी मुलगी रेने सेन 24 वर्षांची झाली आहे. लेकीच्या 24 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने खास फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने फोटोसोबत रेनेसाठी एक प्रेमळ नोटही शेअर केली आहे. फोटोंमध्ये रेने सुश्मितासोबत पोझ देताना दिसत आहे.
सोशल मीडियावर रेनेचे फोटो शेअर करताना सुश्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या पहिल्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज माझी मुलगी त्याच वयात आहे, जितकी मी होते, जेव्हा ती माझ्या आयुष्यात आली होती. तुझ्या आयुष्याचा प्रवास पाहताना मी अभिमानाने आणि प्रेमाने भारावलेली आहे. बाळा तूच माझी नशीब आहेस", या शब्दात सुश्मिताने मुलीवरील प्रेम व्यक्त केले आहे.
केवळ सुश्मिताच नव्हे, तिच्या मुलीनेही आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आईच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना रेनेनेही लिहिले की, या फोटोत माझी आई ज्या वयात दिसत आहे. आज त्या वयात मी आले आणि आयुष्याचं एक वर्तुळ पुर्ण झालं. आई तुझी मुलगी होणं हा देवाचा सर्वोत्तम आशीर्वाद आहे'. रेनेने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर सुश्मिता सेनसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.
सुश्मिता 24 वर्षांची असताना तिने रेनेला दत्तक घेतलं होतं. त्यादरम्यान, अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे इंडस्ट्रीतील अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. तरीही अभिनेत्री तिच्या निर्णयावर ठाम राहिली. सुश्मिताने 2000 मध्ये रेनेला दत्तक घेतले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी त्यांची दुसरी मुलगी अलिशा सेन हिला दत्तक घेतले. अभिनेत्री तिच्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सुश्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिची ताली ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजत आहे. तृतीयपंथियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये सुश्मिता मुख्य भूमिकेत झळकली आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत अनेक मराठी कलाकारांनीही स्क्रीन शेअर केली आहे.