एक प्रेम कहाणी सगळ्यांपेक्षा न्यारी... ! सुश्मिताने सेनने सांगितली तिची ‘लव्हस्टोरी’, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:12 AM2020-05-20T11:12:28+5:302020-05-20T11:21:35+5:30
होय, सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सुश्मिताने तिची लव्ह स्टोरी सर्वांना सांगितली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या आजाराबद्दल खुलासा केला होता. आता सुशने तिच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला आहे. होय, सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने तिची लव्ह स्टोरी सर्वांना सांगितली आहे.
लॉकडाऊन काळात सुश्मिता तिच्या दोन मुली व बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत वेळ घालवतेय.
याचदरम्यानचा एक व्हिडीओ तिने शेअर केला. या व्हिडीओ तिच्या मुली एलिजा आणि रेने पियानोवर काही ट्यून्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. सुश्मिताने तिच्या मुलींचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘माझी लव्ह स्टोरी...’
या व्हिडीओमध्ये सुश्मिताची लहान मुलगी एलिजा आपली मोठी बहीण रेने हिला गाइड करताना दिसत आहे. सुश्मिताचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
काही दिवसांपूर्वी सुश्मिता तिच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. तशीही ती तिच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते. अद्याप अविवाहित असेलेली सुश्मिता दोन मुलींची आई आहे. तिने या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. दीर्घकाळापासून ती मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
अशी सुरु झाली होती सुश- रोहमनची लव्हस्टोरी
रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. होय, रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला.
या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन कधी ओपन करत नव्हती.( हा ऑप्शन ओपन केल्यावर मॅसेज पाठवणा-यास ‘वेलकम इन माय पर्सनल स्पेस’ अशा आशयाचा मॅसेज जातो.) एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. सुश्मिताचा रिप्लाय आलेला पाहून रोहमनचे काय व्हावे? त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मग काय मॅसेजचा हा ‘सिलसिला’ सुरु झाला. यानंतर रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली. आता तर हे नाते बरेच पुढे गेले आहे.