४९ वर्षीय सुश्मिता सेन बोहल्यावर चढणार? म्हणाली "मला लग्न करायचंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:31 IST2025-02-25T11:31:19+5:302025-02-25T11:31:34+5:30

सुश्मिताने ती लग्न कधी करणार याचा खुलासा केला आहे.

Sushmita Sen shares Her Wedding Plans And Expectations For Husband | ४९ वर्षीय सुश्मिता सेन बोहल्यावर चढणार? म्हणाली "मला लग्न करायचंय"

४९ वर्षीय सुश्मिता सेन बोहल्यावर चढणार? म्हणाली "मला लग्न करायचंय"

अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिचं वैयक्तिक आयुष्य कधीही कोणापासून लपवून राहिलं नाही. आजवर या अभिनेत्रीचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं, पण आजही ती अजूनही अविवाहितच आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने अद्याप लग्न का केले नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. आता अखेर सुश्मिताने ती लग्न कधी करणार याचा खुलासा केला आहे.

आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. सुश्मिता सेन ४९ वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे. तिने दोन मुली दत्तक घेतल्या होत्या, ज्यांचा तिनं एकटी आई म्हणून सांभाळ केलाय. तिनं अलीकडेच इंस्टाग्राम लाईव्ह सत्राद्वारे चाहत्यांशी आणि फॉलोअर्सशी संवाद साधला. यावेळी सुश्मिता सेनला एका फॉलोअरनं ती लग्न कधी करणार असा प्रश्न केला. यावर सुश्मितानं लग्न करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं. ती म्हणाली, 'मलाही लग्न करायचं आहे. पण, लग्नासाठी योग्य असा कोणीतरी मिळायलाही हवा. लग्न असंच तर होत नाही. असं म्हणतात की मनाचे नाते खूप रोमँटिक पद्धतीने जोडलं जातं, ती व्यक्ती मनापर्यंत पोहचली की करेल लग्न".

गेल्या अनेक वर्षांपासून सुश्मिता रोहमन शॉलला डेट करत आहे. मध्यंतरी मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर २०२२ मध्ये सुश्मिताचे नाव ललित मोदीशी जोडलं गेलं. पण, त्यानंतर पुन्हा सुश्मिता रोहमनसोबत दिसली. दोघे पुन्हा एकत्र आल्याचं म्हटलं जातं.  कामाच्या बाबतीत बोलायचं झाले तर, सुश्मिता शेवटची डिस्ने प्लस हॉटस्टारच्या क्राइम थ्रिलर वेब सीरिज 'आर्या'मध्ये दिसली होती. या सीरिजचे आतापर्यंत तिन सिझन आले आहेत.

Web Title: Sushmita Sen shares Her Wedding Plans And Expectations For Husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.