Video : "मर्द कभी माँ नही बन सकता", सुष्मिता सेनच्या 'ताली' वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:24 PM2023-08-07T18:24:16+5:302023-08-07T18:37:00+5:30

सुष्मिता सेनच्या 'ताली' वेब सीरिजचा ट्रेलर पाहिला का?

sushmita sen taali web series on transgender gauri sawant trailer released | Video : "मर्द कभी माँ नही बन सकता", सुष्मिता सेनच्या 'ताली' वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

Video : "मर्द कभी माँ नही बन सकता", सुष्मिता सेनच्या 'ताली' वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आगामी 'ताली' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने तृतीयपंथी गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. गौरी सावंत यांचा जीवनप्रवास या वेब सीरिजमधून दाखविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित वेब सीरिजचा ट्रेलरला प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'ताली' या वेब सीरिजच्या ट्रेलरमधून गौरी सावंत यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. गणेशचा गौरी सावंत होण्याच्या प्रवासाची झलक या वेब सीरिजच्या ट्रेलरमधून दाखविण्यात आली आहे. तृतीयपंथियांना त्यांची ओळख आणि हक्क मिळवून देण्यासाठी गौरी सावंत यांनी दिलेला लढा या सीरिजच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. गौरी सावंत यांच्या भूमिकेत असलेल्या सुष्मिताची झलक सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सुष्मिताचा अभिनय आणि उत्कृष्ट संवादफेक याने ट्रेलरमधून सीरिजबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. गौरी सांवत या व्यक्तिरेखेचे अनेक पैलू ट्रेलरमध्येही स्पष्ट दिसत आहेत.

"तो मेहनती मुलगा, करिअरमध्ये आणि आयुष्यात...", रोहित शेट्टीने शिव ठाकरेबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठी अभिनेत्रीला आकारला गेला तिपट्ट टोल, नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली...

मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी 'ताली' या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी या सीरिजचे संवादलेखन केलं आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता सेनसह ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, हेमांगी कवी हे कलाकारही झळकले आहेत. १५ ऑगस्टला 'ताली' ही सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

Web Title: sushmita sen taali web series on transgender gauri sawant trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.