सुश्मिता सेनने घेतलं दुर्गा मातेचं दर्शन, धुनुची नृत्याने वेधलं सर्वांचं लक्ष; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 12:12 PM2023-10-22T12:12:12+5:302023-10-22T12:12:39+5:30
सुश्मिता सेन आपल्या दोन मुलींसोबत मुंबईतील एका नवरात्रोत्सवात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आली होती.
नवरात्रोत्सव सध्या उत्साहात साजरा होत आहे. अनेक ठिकाणी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जात आहे. सेलिब्रिटींवरही नवरात्रीचा रंग चढला आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) नुकतीच दर्शनासाठी दुर्गा पंडाल मध्ये पोहोचली. यावेळी तिच्या सौंदर्यावर सर्वांचीच नजर खिळली. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलं होतं.
सुश्मिता सेन आपल्या दोन मुलींसोबत मुंबईतील एका नवरात्रोत्सवात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आली होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुश्मिताने केवळ दर्शनच घेतलं नाही तर धुनुची हे पारंपारिक नृत्यही केलं. तिच्या नृत्याने नवरात्रोत्सवाची शोभाच वाढवली.
सुश्मिता सेनच्या दोन्ही मुली रेने आणि अलिशा या दत्तक घेतलेल्या आहेत. सुश्मिता केवळ २४ वर्षांची होती जेव्हा तिने रेने ला दत्तक घेतलं होतं. तर २०१० मध्ये तिने अलिशा या आणखी एका मुलीला दत्तक घेतलं. सुश्मिताचा जन्म हैदराबादमध्ये झाला मात्र ती बंगाली कुटुंबातून येते. तिचे वडील शुभीर सेन हे विंग कमांडर होते तर आई सुभ्रा सेन यांचा दुबईत ज्वेलरी बिझनेस आहे. सुश्मिताची 'आर्या' ही वेवसिरीज खूप गाजली. आता सिरीजचा तिसरा भाग लवकरच रिलीज होत आहे. याचा ट्रेलर आला असून सुश्मिताचा अॅक्शन अवतार चाहत्यांना आवडला आहे. चाहते सीरिजची वाट बघत आहेत.