कडाक्याच्या थंडीत सुश्मिताने परिधान केली मोनोकिनी; मायनस 1 डिग्रीमध्ये उतरली स्विमिंग पूलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:35 PM2024-01-18T15:35:13+5:302024-01-18T15:35:43+5:30

Sushmita sen: सुश्मिताचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.

sushmita-sen-wearing-monokini-entered-the-pool-in-minus-1-temperature-video | कडाक्याच्या थंडीत सुश्मिताने परिधान केली मोनोकिनी; मायनस 1 डिग्रीमध्ये उतरली स्विमिंग पूलमध्ये

कडाक्याच्या थंडीत सुश्मिताने परिधान केली मोनोकिनी; मायनस 1 डिग्रीमध्ये उतरली स्विमिंग पूलमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita sen) गेल्या काही काळापासून तिच्या करिअरसोबतच पर्सलन आयुष्यामुळेही चर्चेत येत आहे. रोहमन शॉ सोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत येणारी सुश्मिता सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सुश्मिता कडाक्याच्या थंडीमध्ये चक्क मोनोकिनी परिधान करुन स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सुश्मिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते.अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती सकाळच्या थंडीत स्विमिंग पूलमध्ये उतरली. यावेळी तिच्या आजुबाजूला धुकं दिसत असून तेथील थंडीचा अंदाज लावता येत आहे. मात्र, सुश्मिताने थंडीचा विचार न करता चक्क मोनोकिनी परिधान करुन पाण्यात उतरली.

हा व्हिडीओ पोस्ट करत सुश्मिताने येथील तापमान मायनस १ डिग्री असल्याचं सांगितलं. "बर्फाने अच्छादलेले पर्वत, मायनस १ डिग्री तापमान, एक गरम आऊटडोर पूल आणि त्यात मस्त विहार करणं..., काय अनुभव आहे मोकळ्या आणि निसर्गरम्या वातावरणात राहण्याचा", असं कॅप्शन तिने दिलं आहे.

दरम्यान, सुश्मिता जरी स्विमिंग पूलमध्ये उतरली असली तरी सुद्धा पूलमधील पाणी गरम होतं. परंतु, तिच्या आजुबाजूला मात्र बोचरी थंडी होती हे या व्हिडीओवरुन लक्षात येतं. अलिकडेच  सुश्मिता, आमिर खानची लेक आयरा खान हिच्या लग्नात स्पॉट झाली होती. यावेळी तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 

Web Title: sushmita-sen-wearing-monokini-entered-the-pool-in-minus-1-temperature-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.