'तो गुणी मुलगा आहे'; आर्यनच्या अटकेवर हृतिक रोशनच्या एक्स वाईफची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 16:45 IST2021-10-05T16:45:00+5:302021-10-05T16:45:00+5:30
Sussanne khan: सुझानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी तिचं मत मांडलं आहे. "मला वाटतंय ही चर्चा फक्त आर्यन खानची नाही.

'तो गुणी मुलगा आहे'; आर्यनच्या अटकेवर हृतिक रोशनच्या एक्स वाईफची प्रतिक्रिया
मुंबईतील समुद्रात एका क्रुझवर ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी एनसीबीने शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर कलाविश्वात एकच गोंधळ उडाला असून अनेक सेलिब्रिटी याप्रकरणी व्यक्त झाले आहेत. काही जणांनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. तर, काही जणांनी त्याला ट्रोल केलं आहे. यामध्येच आता अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान हिने प्रतिक्रिया दिली आहे.
सुझानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी तिचं मत मांडलं आहे. "मला वाटतंय ही चर्चा फक्त आर्यन खानची नाही. दुर्दैवाने तो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी सापडला. या प्रकरणाकडे एक उदाहरण म्हणून नक्कीच पाहता येईल. अनेक जण बॉलिवूडमधील लोकांना लगेचच विच हंट करायला सुरुवात करतात. ही खरंच फार चुकीची आणि त्रासदायक घटना आहे. कारण, तो खरंच फार गुणी मुलगा आहे. मी गौरी आणि शाहरुखसोबत आहे", अशी पोस्ट सुझानने केली आहे.
Aryan Khan Arrest News : धाकात वाढलेला आर्यन ड्रग्सच्या आहारी कसा?
दरम्यान, आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर अनेक सेलिब्रिटींना त्याला पाठिंबा दिला आहे. यामध्ये सलमान खान आणि त्याचे कुटुंबीयदेखील शाहरुखच्या बाजूने आहेत. त्यातच आता सुझान खाननेदेखील तिचा पाठिंबा दर्शवला असून अनेकांचं लक्ष आता या प्रकरणाकडे लागलं आहे.