हंगामा बॉलिवूड म्युझिक फेस्टिव्हमध्ये सुखविंदर सिंग करणार परफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 01:13 PM2018-10-18T13:13:21+5:302018-10-18T16:00:00+5:30

सुखविंदर सिंग या शोमध्ये परफॉर्मे करण्यासाठी उत्सुक आहे. सुखविंदरने आजपर्यंत बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत.

Suvvindar Singh's performance in the Bollywood Bollywood Music Festival | हंगामा बॉलिवूड म्युझिक फेस्टिव्हमध्ये सुखविंदर सिंग करणार परफॉर्म

हंगामा बॉलिवूड म्युझिक फेस्टिव्हमध्ये सुखविंदर सिंग करणार परफॉर्म

googlenewsNext
ठळक मुद्दे'छैयां छैयां' गाण्यासाठी सुखविंदरला फिल्मफेयर मिळाला

हंगामा बॉलिवूड म्युझिक फेस्टिव्हल आपल्या चौथ्या सीझनला घेऊन लवकरच आपल्या भेटीला येते  आहे. महाराष्ट्रातील आजच्या घडीचे संगीतकार  अजय- अतुल पहिल्या दिवशी परफॉर्मे करणार आहेत. हा म्युझिक फेस्टिवल 20 आणि 21 ऑक्टोबर दरम्यान बीकेसी, जिओ गार्डन्स येथे रंगणार आहे. 

साधारण 50 हुन अधिक कलाकार या फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणार आहेत. यात सुखविंदर सिंगसुद्धा दुसऱ्या दिवशी परफॉर्म करणार आहे. सुखविंदर सिंगसह यात अजय-अतुल, जावेद अली, असीस कौर, बेन्नी दयाल, दिव्या कुमार, जस्सी गिल, बब्बल राय आणि मोहम्मद इरफान या दिग्गज कलाकारांचा यात समावेश असेल. दोन दिवस चालणारा हा फेस्टिवल बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. इतकेच नव्हे, तर हा फेस्टिवल संगीत, मनोरंजन, खाद्यपदार्थ आणि अनेक अंगांनी अद्वितीय होणार आहे. 

सुखविंदर सिंग या शोमध्ये परफॉर्मे करण्यासाठी उत्सुक आहे. सुखविंदरने आजपर्यंत बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. 1998मध्ये शाहरुख खानचा आलेल्या 'दिल से' सिनेमामधील 'छैयां छैयां' गाण्याला सुखविंदरने आवाज दिला होता. हे गाणं सुपरहिट झाले होते. दिलसे सह ताल, दाग, दिल्लगी, तेरे नाम, चक दे इंडिया, ओम शांति ओम आणि स्लमडॉग मिलियनेयर अशा किती तरी सिनेमांमध्ये त्यांने गाणी गायली आणि जवळपास सगळी हिट सुद्धा झाली. 'छैयां छैयां' गाण्यासाठी सुखविंदरला फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुखविंदचा लाईव्ह परफॉर्मेन्स पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. 

 

Web Title: Suvvindar Singh's performance in the Bollywood Bollywood Music Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.