'जहाँ बिके पवार और...' मणिपूर हिंसाचारावरुन स्वानंद किरकिरेंचा राजकारण्यांना कवितेतून टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:27 PM2023-07-21T13:27:40+5:302023-07-21T13:28:44+5:30
त्यांचं हे ट्वीट सध्याच्या परिस्थितीवर चपखल बसणारं आहे.
मणिपूरमध्ये सध्या सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्शभूमीवर सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. त्यातच दोन महिलांच्या व्हिडिओवरून नागरिकांची राग मस्तकात गेलाय. तो व्हिडिओही तसाच आहे ज्यामुळे प्रत्येक माणूस खवळून उठला आहे. अनेकांनी राग व्यक्त करत सरकारला कठोर कारवाई करण्याविषयी सांगितले आहे. बॉलिवूड गीतकार, लेखक स्वानंद किरकिरे (Swanand Kirkire) यांनी कवितेतून राजकारण्यांना चांगलीच चपराक लगावली आहे.
मणिपूरमध्ये तापलेलं वातावरण आणि मूग गिळून गप्प असलेल्या राजकारण्यांना उद्देशून स्वानंद किरकिरे लिहितात, '“मणिपूर की लड़कियाँ बोली ,,, ओह भारत ओह इंडिया! इज़्ज़त की बची ना चिंधियाँ. वहाँ बिके पवार और सिंधिया. तुम पार्लियामेंट बनाओ नई लगाओ नई नई कुर्सियाँ ,, जनता की काटो मुण्डियाँ ..महँगे टमाटर भिण्डियाँ ओह भारत ओह इंडिया धिक्कार लिज़लिजा मीडिया! सिर्फ़ और सिर्फ़ शर्मिंदगियाँ”.
मणिपुर की लड़कियाँ बोली ,,, ओह भारत ओह इंडिया ! इज़्ज़त की बची ना चिंधियाँ . वहाँ बिके पवार और सिंधिया .तुम पार्लियामेंट बनाओ नई लगाओ नई नई कुर्सियाँ ,, जनता की काटो मुण्डियाँ ..महँगे टमाटर भिण्डियाँ ओह भारत ओह इंडिया धिक्कार लिज़लिजा मीडिया ! सिर्फ़ और सिर्फ़ शर्मिंदगियाँ
— Swanand Kirkire (@swanandkirkire) July 19, 2023
त्यांचं हे ट्वीट सध्याच्या परिस्थितीवर चपखल बसणारं आहे. अनेक कलाकार आणि इतर क्षेत्रातील लोक मणिपूरच्या हिंसाचारावर व्यक्त होत आहेत. मराठी, हिंदीतील सर्वच सेलिब्रिटी आता यावर तोडगा काढणं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हातात आहे. स्वानंद किरकिरेंच्या या कवितेवर नेटकऱ्यांनी ट्वीट करत त्यांचे आभारच मानलेत.