Swara Bhaskar Marriage : स्वरा भास्करच्या 'भाई' ट्विटवर पती फहद अहमदचे स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:53 PM2023-02-20T19:53:20+5:302023-02-20T19:59:41+5:30

Swara Bhaskar Marriage : स्वरा भास्करच्या लग्नानंतर तिने पतीला भाऊ म्हटल्याचे जुने ट्विट व्हायरल होत आहे.

Swara Bhaskar Marriage: Fahad Ahmed's explanation on Swara Bhaskar's 'Bhai' tweet, a scathing reply to trollers | Swara Bhaskar Marriage : स्वरा भास्करच्या 'भाई' ट्विटवर पती फहद अहमदचे स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर...

Swara Bhaskar Marriage : स्वरा भास्करच्या 'भाई' ट्विटवर पती फहद अहमदचे स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर...

googlenewsNext

Swara Bhaskar Marriage: अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतेच सपा नेता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. त्यांच्या झाल्यानंतर स्वराचे एक जुने ट्विट व्हायरल झाले. या ट्विटमध्ये तिने पतीला 'भाऊ' म्हटले होते. या ट्विटवरुन स्वरा आणि फहादला ट्रोल केले जात आहे. आता या ट्विटवर स्वराचा पती फहादने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

त्या ट्विटवर मौन सोडत फहाद म्हणाला, "संघ्यांनी हे मान्य केले की, हिंदू-मुस्लिम भाऊ-बहीण असू शकतात. फक्त हे मान्य करा की, पती-पत्नी विनोदही करू शकतात." दरम्यान, काही काळापूर्वी स्वरा भास्करने फहाद अहमदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याला भाऊही म्हटले होते. ट्रोलर्सनी यावरुनच त्या दोघांना ट्रोल करायला सुरू केले. काही यूजर्सने म्हटले की, स्वराने भावालाच पती बनवले.

काय ट्विट होते?
स्वराने ट्विट केले होते की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा फहाद मियाँ! भावाचा आत्मविश्वास अबाधित राहावा. आनंदी रहा. तू म्हातारा होत आहेस, आता लग्न कर! स्वरा भास्करच्या ट्विटला रिट्विट करत फहाद अहमदने लिहिले होते की, “धन्यवाद. भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे. आणि हो, तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होतेस, त्यामुळे वेळ काढ, मला मुलगी सापडली आहे.

Web Title: Swara Bhaskar Marriage: Fahad Ahmed's explanation on Swara Bhaskar's 'Bhai' tweet, a scathing reply to trollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.