स्वरा भास्करनं केलं मॅटर्निटी फोटोशूट; नवऱ्यासोबत दिल्या रोमँटीक पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 19:18 IST2023-08-28T19:15:59+5:302023-08-28T19:18:27+5:30
स्वरा भास्करचं मॅटर्निटी फोटोशूट समोर आले आहे, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे.

Swara Bhaskar maternity photoshoot
अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या ती तिची पहिली प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीचे मॅटर्निटी फोटोशूट समोर आले आहे, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे.
फोटो शेअर करत स्वरा भास्करनने कॅप्शनमध्ये म्हटले की, “कधी कधी जीवनात काही अनपेक्षित आशिर्वाद मिळतात. त्यानंतर तुमचा स्वतःला शोधण्याचा आणि एकत्र आयुष्य जगण्याचा प्रवास सुरू होतो”. या फोटोशूटमध्ये स्वरा भास्करचा प्रेग्नंसी ग्लो दिसून आला आहे. स्वराने पतीसोबतही रोमँटिक पोझेस देत फोटोशूट केलं आहे. स्वराच्या या फोटोशूटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत आणि या 'टू बी मॉम' चं कौतुक केलं आहे.
स्वरा भास्करने आपल्या उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. स्वराने राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत 6 जानेवारीला लग्न केले होते. दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते.