स्वरा भास्कर म्हणते, 'पंडित जवाहर लाल नेहरू यांनाच देणार मत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 18:23 IST2019-04-04T18:23:12+5:302019-04-04T18:23:34+5:30
अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावरील तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे.

स्वरा भास्कर म्हणते, 'पंडित जवाहर लाल नेहरू यांनाच देणार मत'
अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावरील तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे. स्वराने काही दिवसांपूर्वी कन्हैया कुमारवर ट्विट केले होते आणि हे ट्विट खूप व्हायरल झाले होते. आता तिने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर ट्विट केले आहे.
स्वरा भास्करने ट्विटरवर विचारले की, पंडित जवाहर लाल नेहरू कोणत्या जागेसाठी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत?गेल्या पाच वर्षांपासून मी त्यांच्याबद्दल एवढे ऐकते आहे की मला वाटतेय की त्यांनाच मत दिले पाहिजे. असे ट्विट करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टोला लगावला आहे.
Which constituency is #PanditJawaharlalNehru standing from in #LokSabhaElection2019 ??? Heard about him so much these last 5 years, I think I will vote for him! 🤣🤣🤣
— Swara Bhasker (@ReallySwara) April 4, 2019
लोकसभा निवडणूक २०१९ला ध्यानात ठेवून तिचे हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.
स्वरा भास्कर नेहमी सोशल मीडियावर राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत असते आणि त्यामुळेच बऱ्याचदा ती ट्रोल होते.
स्वराने रांझणा, प्रेम रतन धन पायो, तनु वेड्स मनू व वीरे दी वेडिंग यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही तर तिने वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे.
वीरे दी वेडिंग चित्रपटात ती बोल्ड भूमिकेत पाहायला मिळाली होती आणि या तिच्या भूमिकेची सगळीकडे खूप चर्चादेखील झाली होती.