स्वरा भास्करचा खुलासा, ‘स्क्रिप्टच्या नावाने दिग्दर्शकांनी माझ्याकडून ‘हे’ सर्व करून घेतले’!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 10:47 AM2018-05-19T10:47:05+5:302018-05-19T16:17:05+5:30
आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने अशा एका मुलीची भूमिका साकारली जी चेन स्मोकर असते. ...
आ ामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने अशा एका मुलीची भूमिका साकारली जी चेन स्मोकर असते. वास्तविक स्वरा खºयाखुºया आयुष्यात धूम्रपानापासून चार हात लांब राहणे पसंत करते. मात्र या चित्रपटात ती कट्टर स्मोकर म्हणून दिसणार आहे. स्वरा ‘अनारकली आॅफ आरा’ या चित्रपटातही बिडी पितांना दिसली होती. मात्र या चित्रपटात तिचा अनुभव इतका कटू होता की, तिने स्मोकिंगवाले सीन न करण्याचा निर्णय घेतला होता. मग तिच्या हातून मोठे अन् दमदार प्रोजेक्ट गेले तरी चालेल, असे तिने ठरविले आहे.
स्वराने सांगितले की, ‘अनारकली आॅफ आरा’ या चित्रपटात मी धूम्रपान केल्यामुळे माझी तब्येत बिघडली होती. ‘वीरे दी वेडिंग’मध्येही मला तेच काम करावे लागले. ज्यामुळे मला त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.’ स्वराने म्हटले की, ‘दिग्दर्शक शशांक घोषने सांगितले की, तू व्यवस्थित स्मोकिंग करीत नाही. तुला या भूमिकेत मिसळण्यासाठी याबाबतची प्रॅक्टिस करावी लागेल. पुढे जेव्हा मी चांगल्या पद्धतीने स्मोकिंग करायला लागली तेव्हा दिग्दर्शकांनी माझ्या हातात सिगारेट दिली. तो क्षण खरोखरच माझ्यासाठी खूप वाईट होता. कारण मी यापेक्षा वाईट चव मी माझ्या आयुष्यात कधीच घेतली नाही.
पुढे बोलताना स्वराने म्हटले की, ‘करिना, सोनम आणि शिखा तलसानियासोबत शूटिंग करताना खूप मज्जा आली. त्यामुळे जेव्हा चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली तेव्हा मला खूपच वाईट वाटले. मात्र स्वरा भास्कर यामुळेदेखील आनंदी होती की, तिला आता पुन्हा स्मोक करण्याची गरज पडणार नाही. दरम्यान, स्वराने आता हा निर्धारच केला की, ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटानंतर ती कधीही स्मोकिंग करणार नाही. स्वरा अगोदर अभिनेत्री बिपाशा बसू आणि दीपिका पादुकोण यांनीदेखील न स्मोकिंग करण्याचा निर्धार केला आहे.
दरम्यान, स्वरा सध्या स्लिप डिस्कर (कंबरेचे दुखने) या त्रासाचा सामना करीत आहे. डॉक्टरांनी तिला १० दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ती ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भाग घेऊ शकली नाही. स्वराचा हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.