'बकरी ईद'च्या दिवशी स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत, म्हणाली- 'गायींचं दूध चोरून...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:59 PM2024-06-17T13:59:44+5:302024-06-17T14:05:14+5:30
अभिनेत्री स्वरा भास्करच्या एका ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आज देशभरात 'ईद-उल-अधा' तथा 'बकरी ईद' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सेलेब्सनींही चाहत्यांना 'बकरी ईद'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच अभिनेत्री स्वरा भास्करच्या एका ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. ज्यामुळे काहींनी तिचं समर्थन केलंय तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे.
स्वरा भास्करने X प्लॅटफॉर्मवर (Twitter) एका फूड ब्लॉगरचे ट्विट रिट्विट करत शाकाहारी लोकांच्या डाएटिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शाकाहारी लोकाचं डाएट हे गायीच्या चोरलेल्या दुधावर अवलंबून असतं, असं तिने म्हटलं. नलिनी नावाच्या एका फूड ब्लॉगरने आपल्या जेवणाच्या ताटाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात तिनं लिहलं की, 'मी शाकाहारी असल्याचा मला अभिमान आहे. माझं ताट हे अश्रू, क्रूरता आणि पाप मुक्त आहे'. हे ट्विट स्वरा भास्करने रिट्विट करत तिला सुनावलं.
स्वराने लिहलं, 'खरं सांगायचे तर मला शाकाहारी लोकांबद्दल काही समजत नाही. तुमचा संपूर्ण आहार गायीच्या दुधावर अवलंबून असतो. एका बछड्याला आपल्या आईच्या दुधापासून दूर ठेवलं जातं. गायींना बळजबरीने गर्भधारणा करवली जाते, नंतर गायींना बाळांपासून वेगळं करुन त्यांचं दूध चोरलं जातं. याशिवाय तुम्ही ज्या मुळ भाज्या खाता, ज्यामुळे संपूर्ण वनस्पतीही नष्ट होते. पण, आज तुम्ही लोकांनी थोडा आराम केलं तर बरं होईल, कारण आज बकरी ईद आहे.
स्वराची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टवर अनेकांनी स्वराविरोधात कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहलं, 'आईच्या दुधापासून वासराला वेगळे करणे चुकीचे आहे, हे मला मान्य आहे. पण तुम्ही अशा प्रकारे तुलना करुन लाखो प्राण्यांच्या हत्येला न्याय देत आहात का? दिवाळीत मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नयेत आणि होळीच्या दिवशी प्राण्यांना रंग लावू नये, याचा तुम्हाला त्रास होतो. पण प्राणी मारून सण साजरे करणं आणि त्यांचं सेवन करण्याला तुमचा काहीच आक्षेप नाही'.