सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या आंतरधर्मीय विवाहावर स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:02 AM2024-06-20T10:02:35+5:302024-06-20T10:23:13+5:30

सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही २३ जून रोजी लग्न करणार आहेत.

Swara Bhasker Talks About Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding | सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या आंतरधर्मीय विवाहावर स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या आंतरधर्मीय विवाहावर स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding :  बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.  सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही २३ जून रोजी लग्न करणार आहेत. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.  सोनाक्षी हिंदू आणि झहीर हा मुस्लिम आहे. यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं स्पष्ट मत माडलं. 

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावर अभिनेत्री स्वरा भास्करने 'कनेक्ट सिने' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे ट्रोलिंग होणं ही किती सामान्य गोष्ट असल्याचं सांगितलं. स्वारा म्हणाली, 'आधुनिक भारतात लव्ह जिहाद सर्वात मोठी कल्पित धारणा आहे.. यामध्ये एक हिंदू मुलगी मुस्लीम मुलाशी लग्न करते. ही गोष्ट मलाही लागू होते. काही शहरांमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आंतरधर्मीय जोडप्यांना मारहाण केली जाते. माझं लग्न झाल्यावर अनेकांनी आपली मतं मांडली होती'

. पुढे स्वरा म्हणाली, 'खरंतर लग्न ही गोष्ट दोन व्यक्तींमध्ये होते.  भारतात आणि काही दक्षिण आशियाई देशांमध्ये अशा गोष्टी सर्वाधिक घडतात. इकडे लोक इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसतात. अजून काही वर्षांनंतर जेव्हा जेव्हा सोनाक्षी आणि झहीरला मुलं होतील, तेव्हा त्यांच्या मुलांच्या नावांवरून वेगळी चर्चा सुरू होईल. करीना कपूर आणि सैफला मुलं झाली होती. तेव्हा हेच झालं होतं. शिवाय माझ्याबाबतीतही हेच पाहायला मिळालं. 

 स्वरा म्हणाली, 'दोन सुजाण व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात? ते लग्न करतात करतात की नाही या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वत:वर अवलंबून असतात. एकत्र राहणं, कोर्टात लग्न करतात की निकाह? की ते दोघं आर्य समाजात लग्न करतात याबद्दल इतरांनी चौकशा करू नयेत. त्याचा इतरांशी कोणताही संबंध नाही. हा एक स्त्री-पुरुष आणि त्यांचं कुटुंब यांच्यातला वैयक्तिक विषय आहे. याचप्रमाणे हे पूर्णत: सोनाक्षीचं आयुष्य आहे. तिने आपला जोडीदार स्वत: निवडला आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांची परवानगी आहे की नाही हा त्यांचा विषय आहे'.

दरम्यान, सोनाक्षीचं कटुंब तिच्या लग्नाच्या विरोधात असल्याचं बोललं जातं आहे. सोनाक्षीचे वडील अर्थात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीच्या लग्नामुळे नाराज असल्याची चर्चा आहे.  बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि झहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत. 


 

Web Title: Swara Bhasker Talks About Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.