Swara Bhasker : ‘बंपर सेल’ लावा दर 5 वर्षांनी...महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलली स्वरा भास्कर, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:25 PM2022-06-23T12:25:00+5:302022-06-23T12:26:05+5:30

Maharashtra Politics Crisis, Swara Bhasker Tweet : महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपाचे पडसाद सर्वदूर उमटत आहेत. अनेक सेलिब्रिटी सुद्धा यावर व्यक्त होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. पण...

swara bhasker trolled after tweet on maharashtra politics crisis shivsena | Swara Bhasker : ‘बंपर सेल’ लावा दर 5 वर्षांनी...महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलली स्वरा भास्कर, झाली ट्रोल

Swara Bhasker : ‘बंपर सेल’ लावा दर 5 वर्षांनी...महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलली स्वरा भास्कर, झाली ट्रोल

googlenewsNext

Maharashtra Politics Crisis : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला ( Shiv Sena) जबर हादरा बसला आहे. महाराष्ट्राच्याराजकारणातील या भूकंपाचे पडसाद सर्वदूर उमटत आहेत. अनेक सेलिब्रिटी सुद्धा यावर व्यक्त होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर  (Swara Bhasker Tweet) हिने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. पण या प्रतिक्रियेनंतर ती जबरदस्त ट्रोल झाली.

‘काय बकवास सुरू आहे. आम्ही मतदान करतोच का? निवडणुकीऐवजी बंपर सेल लावा दर 5 वर्षांनी,’ असं संतप्त ट्विट स्वरा भास्करने केलं. पण या ट्विटनंतर स्वराला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं.

स्वरा ही मुंबईची नाही तर दिल्लीची मतदार आहे. यामुळे अनेकांनी तिला फैलावर घेतलं. ‘बघ, पहिली गोष्ट तू दिल्लीची मतदार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रानं भाजप आणि शिवसेनेला मतं दिली होती आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. अडीच वर्षापासून शांत बसली होतीस, आत्ताही तशीच शांत बस..,’ अशी कमेंट एका युजरने केली.


‘मॅडम, आधी सत्तेसाठी सौदेबाजी झाली ती दिसी नाही का? आता मामला तुझ्या अजेंड्याचा आहे म्हटल्यावर तुला सेल दिसतोय,’ अशा शब्दांत एका युजरने तिला सुनावलं.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केलंय, यामध्ये काही अपक्ष आमदारही आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडी आता कोणत्या वळणावर पोहचणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले आहे. 

Web Title: swara bhasker trolled after tweet on maharashtra politics crisis shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.