सिंहाचा लव्ह जिहाद! सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:23 AM2024-02-19T10:23:43+5:302024-02-19T10:24:09+5:30
सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली, "भारतात..."
सध्या देशात एक प्रकरण गाजत आहे. सीता आणि अकबर नावाच्या सिंहावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. सिलिगुडीच्या सफारी पार्कमध्ये या नर-मादी सिंहाला एकत्र ठेवण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या वनविभागानं घेतला. त्यानंतर खळबळ उडत हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. विश्व हिंदू परिषदेने यावर आक्षेप घेत कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप विहिंपने केला आहे. यावर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केलं आहे.
स्वराने Xवर ट्वीट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने लव्ह-जिहादचा उल्लेखही केला आहे. "संघींवर आता सिंहाच्या लव्ह-जिहादचं संकट...भारतात अशा मुर्खपणाला आपण केंद्रस्थानी ठेवलं आहे," असं स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. स्वराचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.
Sanghis now floating Lion-Love-Jehad crisis 😂😂😂😂
— Swara Bhasker (@ReallySwara) February 17, 2024
The searing idiocy that we have given centre stage to in India… 🙏🏽 https://t.co/iuyKROynMx
विश्व हिंदू परिषदेने याचिकेत काय म्हटलं?
अकबर हा मुघल सम्राट होता आणि वाल्मिकींच्या ‘रामायण’नुसार सीता ही प्रभू रामाची पत्नी आहे आणि हिंदू देवी म्हणून पूजनीय आहे. राज्याच्या वनविभागाने ही नावं सिंहांना दिली आणि ‘सीता’चा ‘अकबर’शी संबंध जोडणं हिंदूंचा अपमान असल्याचं विहिंपचं म्हणणं आहे. सिंहांची नावं बदलण्याची मागणी विहिंपकडून करण्यात आली आहे. तर वनविभागानं यावर उत्तर देताना असा युक्तिवाद केला की सिंहांना १३ फेब्रुवारीला त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणी उद्यानातून आणण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची नावं सफारी पार्कमध्ये आल्यावर बदलण्यात आलेली नाहीत. या प्रकरणाची सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे.