Mahesh Manjarekar: कन्फर्म! शुटिंग आठवड्यावर आले, महेश मांजरेकरांची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटातून माघार, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:44 PM2022-09-20T18:44:22+5:302022-09-20T18:45:26+5:30

Mahesh Manjarekar opted out Swatantra Veer Savarkar Biopic: सावरकरांवरील बायोपिकचे डायरेक्शन करण्यासाठी पहिली ऑफर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना देण्यात आली होती.

Swatantra Veer Savarkar Biopic Big Update: confirm! Mahesh Manjarekar will not direct Swatantra Veer Savarkar Biopic; randeep hooda to direct | Mahesh Manjarekar: कन्फर्म! शुटिंग आठवड्यावर आले, महेश मांजरेकरांची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटातून माघार, कारण काय?

Mahesh Manjarekar: कन्फर्म! शुटिंग आठवड्यावर आले, महेश मांजरेकरांची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटातून माघार, कारण काय?

googlenewsNext

गेल्या काही काळापासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकची चर्चा होत आहे. या बायोपिकसाठी सावरकरांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा साकारणार आहे. या सिनेमाचा पहिला लूकदेखील आला आहे. पोस्टर रिलीज झालेले असले तरी डायरेक्टर तयार नसल्याने निर्मात्यांची कोंडी झाली आहे. 

सावरकरांवरील बायोपिकचे डायरेक्शन करण्यासाठी पहिली ऑफर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना देण्यात आली होती. त्यांनी सारवकरांवरील सिनेमाचे दिग्दर्शन करण्यातून माघार घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणदीप हुड्डाचा आता या बायोपिकचे डायरेक्शन करणार आहे. 

लोकमतने यावर महेश मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याचे कारण अद्याप त्यांनी सांगितलेले नसून ते नंतर सांगेन असे ते म्हणाले आहेत. 
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या स्क्रीप्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भूमिकेसाठी रणदीप हुडा खूप मेहनत घेत आहे, याची झलक चित्रपटाच्या फर्स्ट लूकमधून पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेसाठी रणदीपला सामील करून घेण्यात आल्यामुळे अभिनेता अत्यंत आनंदी आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रामध्ये याचं शूटिंग सुरू होणार आहे. सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपनं २५ किलो वजन कमी केलं आहे.

कारण काय?
महेश मांजरेकर यांनी सलमान खान आणि आयुष शर्माची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'अँटीमा: द लास्ट ट्रुथ' दिग्दर्शित केला होता. आता ते आगामी चित्रपट 'वीर दौडले सात' या मराठी आणि हिंदीतून असलेल्या ऐतिहासिक चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त असणार आहेत. याचबरोबर त्यांनी 'नीरवधी' चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच ते  'बिग बॉस मराठी' चा चौथा सिझन देखील होस्ट करणार आहेत. 

Web Title: Swatantra Veer Savarkar Biopic Big Update: confirm! Mahesh Manjarekar will not direct Swatantra Veer Savarkar Biopic; randeep hooda to direct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.