'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला लोकांचा पाठिंबा नाही म्हणून रणदीपने व्यक्त केली खंत, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:22 PM2024-04-01T13:22:29+5:302024-04-01T13:22:51+5:30
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा रिलीज झालाय. पण या सिनेमाला लोकांनी कोणताही सपोर्ट न दिल्याने रणदीपने एका मुलाखतीत याबद्दल मौन सोडलंय
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा पाहायला अनेक लोकं थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीप हूडाने वीर सावरकरांची प्रमुख भूमिका साकारलीय. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं कौतुक होत असतानाच सिनेमाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल रणदीपने पहिल्यांदाच मौन सोडलंय. रणदीपने प्रसिद्ध पॉडकास्टर 'बीअर बायसेप्स'सोबत दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलंय. काय म्हणाला रणदीप?
रणदीप हूडा म्हणाला, "अशा पद्धतीच्या सिनेमांना कोणी सपोर्ट करत नाही. क्रांतीकारकांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमांना लोकांचा जितका भक्कम पाठिंबा पाहिजे तेवढा मला मिळाला नाही. फक्त ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्यांनीच फक्त सिनेमाला सपोर्ट केला. अन्य कोणीही सिनेमाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे मी एकटा पडलेलो. फक्त माझी बायको आणि माझ्या कुटुंबाला माहितीय आम्हाला कोणत्या काळातून जावं लागलं."
“हिंद से प्यार करने वाले हम सब हिंदू है” #SwatantryaVeerSavarkar, The Freedom Hero who struggled for a Unified India, A stronger Nation 🇮🇳
— Randeep Hooda (@RandeepHooda) April 1, 2024
Book your tickets!
🔗 - https://t.co/DbDkzKqafN
In cinemas now. #VeerSavarkarInCinemasNow#WhoKilledHisStory@ZeeStudios_… pic.twitter.com/xbI2bc9Lvw
अशाप्रकारे 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी लोकांनी अपेक्षित पाठिंबा न दर्शवल्याने रणदीपनं नाराजी दर्शवली. २२ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदीबरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता मराठीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुक्रवारी २९ मार्चपासून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीतून प्रदर्शित केला गेलाय.