आणखी एक बायोपिक रसिकांच्या भेटीला, अजय देवगण साकारणार 'ही' भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 05:58 PM2019-03-02T17:58:37+5:302019-03-02T18:01:51+5:30
दिग्दर्शक अमित शर्मा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. जूनमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
बायोपिक म्हटला की त्या चित्रपटाची साऱ्यांनाच उत्सुकता असते. रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. आता बॉलीवूडमध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक असणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण झळकणार आहे. दिग्दर्शक अमित शर्मा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. जूनमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार 2’ बंद!
अजय देवगणने काही दिवसांपूर्वी ‘बॅटल ऑफ सारागढी’वर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव होते, ‘सन ऑफ सरदार 2’. सारागढीचे युद्ध भारतीय इतिहासातील सर्वाधिक यादगार युद्धांपैकी एक आहे. या युद्धात केवळ २१ शिख सरदारांनी १० हजार अफगाणी सैन्याला मात दिली होती. याच युद्धावरचा ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण ताजी बातमी खरी मानाल तर, अजय देवगणने हा चित्रपट व्हा हा चित्रपट भव्यदिव्य रूपात बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
साहजिकच यासाठी मोठ्या तयारीची गरज होती. चित्रपटात खूप मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्स तंत्राची गरज भासली असती. हे बघता कदाचित पोस्ट प्रॉडक्शनच्या कामावरचं घोडे अडले आणि अजयने हा चित्रपट बनवण्याचा विचार सोडून दिला, असे वाटतेय. याशिवाय या चित्रपटाची कल्पना रद्द करण्यामागे आणखी एक कारण असू शकते. ते म्हणजे, अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘केसरी’. होय, अक्षयचा ‘केसरी’ हा सिनेमाही सारागढी युद्धावर आधारित आहे. एकाच विषयावर दोन चित्रपट बनण्यात काहीही अर्थ नाही, कदाचित हा विचार करूनही अजयने हा सिनेमा न बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजतंय.