​टायगर श्रॉफ घेणार सिल्वस्टर स्टेलॉनची जागा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 06:51 AM2017-05-19T06:51:12+5:302017-05-19T12:21:12+5:30

टायगर श्रॉफला बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार म्हणायला हरकत नाही. आपल्या पहिल्या डेब्यूपासून बॉलिवूड अ‍ॅक्शनला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा टायगर ...

Sylvester Stallone's place to take Tiger Shroff !! | ​टायगर श्रॉफ घेणार सिल्वस्टर स्टेलॉनची जागा!!

​टायगर श्रॉफ घेणार सिल्वस्टर स्टेलॉनची जागा!!

googlenewsNext
यगर श्रॉफला बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार म्हणायला हरकत नाही. आपल्या पहिल्या डेब्यूपासून बॉलिवूड अ‍ॅक्शनला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा टायगर आता पुन्हा एकदा दमदार अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. होय, सुपरहिट हॉलिवूड चित्रपट ‘रँबो’च्या हिंदी रिमेकसाठी टायगरचे नाव फायनल झाले आहे. ‘रँबो’ या ‘आयकॉनिक’ हॉलिवूडपटात सिल्वस्टर स्टेलॉन होता. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये टायगर स्टेलॉनची जागा घेणार आहे.



दिग्दर्शक सिद्धार्थ  आनंद हा रिमेक घेऊन येणार असल्याचे कळतेय. एम. कॅपिटल वेंचर, ओरिजनल एंटरटेनमेंट, इपेक्ट फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंद पिक्चर्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असेल. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण या चित्रपटाचा हिरो मात्र ठरला आहे. आधी यातील लीड रोलमये सिद्धार्थ मल्होत्रा व हृतिक रोशन यांच्या नावांवर विचार झाला. पण त्यांच्यासोबत चर्चा फिस्कटली आणि ही भूमिका टायगरकडे चालून आली.

ALSO READ : टायगर श्रॉफ इतका ‘HOT beach boy ’ तुम्ही पाहिलायं?

निश्चितपणे टायगर या भूमिकेसाठी कमालीचा उत्सूक आहे. मात्र मी कधीही सिल्वस्टर स्टेलॉनची जागा घेऊ शकणार नाही, असे त्याने म्हटले आहे. मार्शल आर्ट्स माझा जीव की प्राण आहे. त्यामुळे लहानपणापासून मी अ‍ॅक्शन चित्रपट पाहातच मोठा झाला आहे. ‘रँबो’च्या हिंदी रिमेकबद्दल मी कमालीचा उत्सूक आहे. पण मी सिल्वस्टरची जागा घेऊ शकेल, असे मला अजिबात वाटत नाही. मी लहानपणापासून अशाच भूमिकेसाठी स्वत:ला तयार केले आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, एवढेच मी म्हणेल, असे टायगर म्हणाला.
येत्या फेबु्रवारीपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट आपल्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Sylvester Stallone's place to take Tiger Shroff !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.