​बॉलिवूडलाही चढलाय ‘टी-20 फिव्हर’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 10:25 AM2016-03-16T10:25:06+5:302016-03-16T03:25:06+5:30

टी-20 विश्वकप स्पर्धेला अगदी धडाक्यात सुरुवात झाली आहे. जो-तो सध्या क्रिकेटच्या रंगात रंगला आहे. क्रिकेटची ही जादू बॉलिवूडच्याही सर ...

'T-20 Fever' | ​बॉलिवूडलाही चढलाय ‘टी-20 फिव्हर’

​बॉलिवूडलाही चढलाय ‘टी-20 फिव्हर’

googlenewsNext
-20 विश्वकप स्पर्धेला अगदी धडाक्यात सुरुवात झाली आहे. जो-तो सध्या क्रिकेटच्या रंगात रंगला आहे. क्रिकेटची ही जादू बॉलिवूडच्याही सर चढ के बोलत आहे.  टी-20 विश्वचषकाच्या सामन्यांचा आनंद लुटता यावा म्हणून बºयाच स्टार्सनी चक्क आपल्या शूटिंगचे शेड्यूल बदलून टाकले आहेत तर काहींनी आपल्या खास मित्रांना घरी बोलावून क्रिकेटचा आनंद लुटण्याचे प्लॅनिंग केले आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट...

क्रिकेटवेडया फिल्मस्टार्समध्ये सुनील शेट्टीचे नाव अगदी समोर आहे. अशा स्पर्धेदरम्यान सुनील अजिबात शूटिंग करीत नाही. तो सांगतो की, ज्या दिवशी  क्रिकेट सामना असेल त्या दिवशी मी टीवीसमोरून हलतच नाही. सुनील शेट्टी एकमेव स्टार नाही की, जो क्रि केटचा महाशौकीन आहे.

किक्रेटची नशा आफताब शिवदासानीवर देखील स्वार आहे. आफताबने मागील विश्वकपदरम्यान एका चित्रपटाची आॅफर फक्त यासाठी नाकारली होती, कारण सामन्यांची तारीख शूटिंगच्या दरम्यान येत होती. रितेश देशमुखचीही परिस्थिती तीच आहे. तो स्वत: क्रिकेट खेळण्याचा शौकीन आहे. तो सांगतो की, जेव्हा क्रिकेटचे सामने असतात, तेव्हा मला काहीच सूचत नाही. टी-20 वर्ल्डकपदरम्यान कुठलीच शूटिंग नको, याची काळजी रितेशनेही घेतली आहे.  अनिल कपूरदेखील क्रिकेट सामन्यांच्या दिवशी आपले सगळे वेळापत्रक गुंडाळून ठेवतो. जैकी श्रॉफचेदेखील असेच आहेत. जेव्हा भारताचा सामना असतो तेव्हा जैकी टीव्हीच्या समोरच ठाण मांडून बसतो. भारतीय टीम जिंकल्यानंतर जल्लोषही करतो.  फरहान अख्तर, त्याचा पार्टनर रितेश, साजिद खान, जायद खान, सुशांत सिंह राजपूत (जो आगामी चित्रपटात धोनीची भूमिका करीत आहे) देखील क्रिकेटचे जबरदस्त फैन आहेत.

फक्त नायकच नव्हे, बॉलिवूडच्या नायिकादेखील क्रिकेटच्या कमी शौकिन नाहीत. भारतीय संघ खेळत असेल तेव्हा  दिया मिर्जा अजिबात घराबाहेर जात नाही. तब्बूदेखील घरातच राहणे पसंत करते. अमृता अरोड़ा, अमिषा पटेल, जुही चावलापासून याकाळातील श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट सारख्या नायिकांसाठी क्रिकेटचे सामने जणू मेजवानीच असते. 


Web Title: 'T-20 Fever'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.