"तिला कॅन्सर नव्हताच", कृष्ण कुमार यांच्या पत्नीची पोस्ट; लेकीच्या निधनामागे 'व्हॅक्सीन' ठरलं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 01:58 PM2024-11-29T13:58:43+5:302024-11-29T14:01:03+5:30
कर्माच्या क्रोधापासून कोणीही सुटू शकत नाही हाच दैवी न्याय आहे.
टी सीरिजचे को ओनर कृष्ण कुमार (Krishan Kumar) यांच्या लेकीचं कमी वयात निधन झालं. काही दिवसांपूर्वीच ही दु:खद बातमी आली. तिशा (Tisha Kumar) असं तिचं नाव होतं. कॅन्सरशी लढा हरल्याने तिशाचा जीव गेला अशीच तेव्हा माहिती मिळाली होती. पण आता किशन कुमार यांची पत्नी तान्या सिंहने (Tanya Singh) सोशल मीडियावर पोस्ट करत वेगळाच दावा केला आहे. त्यांनी टीशाच्या निधनामागे एका व्हॅक्सीनला जबाबदार धरलं आहे.
तान्या यांनी लिहिले, "कसं, का, काय..अनेक लोक मला विचारत आहेत की नक्की काय झालं. सत्य हे एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर आणि तुम्ही कसं घेता त्यावर अवलंबून असतं. एखाद्याच्या चुकीच्या कृत्यामुळे जेव्हा निष्पाप व्यक्तीचा जीव जातो, तेव्हा गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होतात आणि मग उशीर झालेला असतो. पण कर्माच्या क्रोधापासून कोणीही सुटू शकत नाही हाच दैवी न्याय आहे. दुसऱ्याच्या दुष्कृत्यामुळे एखाद्याचं आयुष्यच नष्ट होऊ शकतं."
त्यांनी पुढे लिहिलं, "माझी मुलगी तिशा नैराश्यात नव्हती. ती खूप धैर्याने आजाराचा सामना करत होती. एकदम निडर २० वर्षांची ही मुलगी. मेडिकल डायग्नोसिसला घाबरु नका हाच संदेश ती पोहचवत होती. खरं सांगायचं तर माझ्या मुलीला कॅन्सर नव्हता. ती १५ वर्षांची असताना तिला एक व्हॅक्सीन दिली होती ज्यामुळे तिचं रोगप्रतिकारक शक्तीच ट्रिगर झाली. याचं चुकीचं निदान केलं गेलं. तेव्हा आम्हाला हे माहितच नव्हतं. इतर पालकांना माझी हीच विनंती की जर मुलांमध्ये लिम्फ नोड किंवा सूज दिसली तर बायोप्सी करण्यापूर्वी सेकंड, किंवा थर्ड ओपिनियन नक्की घ्या.