बहुप्रतिक्षित 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 02:25 PM2024-07-15T14:25:48+5:302024-07-15T14:26:28+5:30

'फिर आयी हसीन दिलरुबा'ची रिलीज डेट समोर आली आहे. 

Taapsee Pannu And Vikrant Massey-Starrer Phir Aayi Hasseen Dillruba Release Date Out: Know When And Where To Watch | बहुप्रतिक्षित 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

बहुप्रतिक्षित 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

अभिनेत्री तापसी पन्नूचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'फिर आयी हसीन दिलरुबा' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.  हा सिनेमा 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'हसीन दिलरुबा' चित्रपटाच्या कथेचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करण्यापासून कोणीही मागे हटले नव्हतं. चाहते सिनेमाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. आता अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा'ची रिलीज डेट समोर आली आहे. 

'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तापसी पन्नू, विक्रांत मेसी, सनी कौशल आणि जिमी शेरगिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Netflix ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर 'फिर आयी हसीन दिलरुबा'ची रीलीज डेट जाहीर केली आहे.

तापसी पन्नू आणि विक्रांत यांचा हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे.  'फिर आयी हसीन दिलरुबा' हा 'हसीन दिलरुबा' चा सीक्वल आहे, ज्याचा प्रीमियर केवळ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जुलै 2021 मध्ये झाला होता. 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे. तर चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमात राणी कश्यप आणि ऋषभ सक्सेना यांची कथा पुढे नेण्यात आली आहे. ही रोमँटिक-थ्रिलर फ्रँचायझी पुन्हा एकदा नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Taapsee Pannu And Vikrant Massey-Starrer Phir Aayi Hasseen Dillruba Release Date Out: Know When And Where To Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.