कमाल! तब्बल १२ तास तापसीने बांधली डोळ्यावर पट्टी; तिचा 'हा' निर्णय ऐकून तुम्ही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 07:25 PM2021-11-18T19:25:07+5:302021-11-18T19:25:54+5:30

Taapsee pannu: तापसी लवकरच 'Blur'  या आगामी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे.

taapsee pannu completes film blur shoot shocking facts revealed | कमाल! तब्बल १२ तास तापसीने बांधली डोळ्यावर पट्टी; तिचा 'हा' निर्णय ऐकून तुम्ही कराल कौतुक

कमाल! तब्बल १२ तास तापसीने बांधली डोळ्यावर पट्टी; तिचा 'हा' निर्णय ऐकून तुम्ही कराल कौतुक

googlenewsNext

आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू (taapsee pannu).  'मिशन मंगल', 'नाम शबाना', 'मुल्क' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन तापसीने  प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तापसी लवकरच 'Blur'  या आगामी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. इतकंच नाही तर तिच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी ती कसोशीने प्रयत्न करत आहे. अलिकडेच तापसीने तब्बल १२ तास डोळ्यांवर पट्टी बांधून चित्रपटाच्या सेटवर वावरली.

तापसी साकारत असलेल्या भूमिकेच महत्त्व, त्या भूमिकेमागील अर्थ समजून घेण्यासाठी तापसी प्रयत्न करत होती. त्याचसोबत ती भूमिका ज्या पद्धतीची आहे तेच आत्मसाद करण्यासाठी तापसी सेटवर वावर होती. यामध्ये तिने सकाळी ७ वाजल्यापासून जवळपास १२ तास डोळ्यांवर पट्टी बांधली होती.

"तापसीने तिच्या व्यक्तिरेखेच्या भावना समजून घेण्यासाठी तब्बल12 तास डोळ्यांवर पट्टी बांधून राहण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7 वाजल्यापासून तिने तिच्या डोळ्यांवर कपड्याची पट्टी बांधली आणि दिवसभरातील सर्व कामे डोळे बंद करुनच पार पाडली. डोळ्यावर पट्टी बांधूनच फोन कॉल्सला उत्तर देणे, जेवण, क्रू, कलाकार आणि चित्रपटाच्या टीमशी बोलणे या साऱ्या गोष्टी केल्या, असं चित्रपटाच्या टीम मेंबर्सने सांगितलं.

दरम्यान, तापसी लवकरच ब्लर या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजय बहल करत असून निर्मिती झी स्टुडिओ, आउटसाइडर्स आणि इकोलोन यांच्याअंतर्गत केली जाणार आहे. या चित्रपटात तापसीसोबत गुलशन देवैया स्क्रीन शेअर करणार आहे. 

Web Title: taapsee pannu completes film blur shoot shocking facts revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.