Exclusive तापसी पन्नू या मराठमोळ्या पदार्थावर मारते आवर्जून ताव, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 19:00 IST2019-09-15T19:00:00+5:302019-09-15T19:00:00+5:30
तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे.

Exclusive तापसी पन्नू या मराठमोळ्या पदार्थावर मारते आवर्जून ताव, वाचा सविस्तर
तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'पिंक' सिनेमामधून. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज तापसी बी-टाऊनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परखड बोलणारी अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे.
गेल्या काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. समीक्षकांनीही तापसीला दाद दिली. कामासाठी मुंबईत आलेल्या तापसीला मराठी जेवणही खूप आवडते. एका मुलाखती दरम्यान तापसीने ही सांगितले की, मला जेवणात भाकरी खायला खूप आवडते. एवढेच नाही तर भविष्यात तिला मराठी भाषा शिकायला आवडेल असे ही ती म्हणाली.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, तापसीने काही दिवसांपूर्वी सांड की आँख सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. 'सांड की आँख' जगातील वयस्कर शार्पशूटर असलेल्या चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे.
यात तापसीसोबत भूमी पेडणेकर ही सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तसेच तापसी लवकरच क्रिकेटर मिताली राजची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्यात येणार.