कानामागून आली अन् तिखट झाली...! अवघ्या वर्षभरात तापसी पन्नूने कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:03 PM2020-06-07T17:03:05+5:302020-06-07T17:03:49+5:30
बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना हेवा वाटावा, असेच काही तापसीने केलेय.
कानामागून आली अन् तिखट झाली, ही म्हण बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला अगदी योग्यरित्या लागू पडते. पाहता पाहता बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना हेवा वाटावा, असेच काही तापसीने केलेय. होय, मागच्या वर्षभरात तिचे एक-दोन नाही तर 5 सिनेमा रिलीज झालेत आणि यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली. विशेष म्हणजे स्वत: तापसी मात्र याबाबत अजिबात कल्पना सुद्धा नव्हती. एका मीडिया रिपोर्टवरून ही गोष्ट समजली त्यावेळी ती स्वत:ही हैराण झाली.
Oh nice. Didn’t realise this happened. I guess I should take this moment in quarantine to pause n look back n celebrate the journey it has been so far.
— taapsee pannu (@taapsee) June 6, 2020
Thank you 🙏🏼 https://t.co/ti2VLZARhH
ट्विटरवर तिने याबद्दलचे आश्चर्य व्यक्त केले. तूर्तास तापसीवर बॉलिवूडमधून कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
तापसी एक उत्तम अभिनेत्री आहे़ वेगवेगळ्या धाटणीचे, प्रयोगशील चित्रपट ही तिची खास ओळख. गेल्या वर्षीही तिने अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केलेत. झूम टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तापसीच्या गतवर्षीच्या सर्व सिनेमांनी मिळून एकूण 352 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तापसीला हे कळले, तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले.
You must ❤️ Congratulations Lioness. Proud of you and choices you make! https://t.co/tkEy7PdObP
— Dia Mirza (@deespeak) June 6, 2020
‘अच्छा पण मला हे कधीच जाणवले नाही. मला वाटते मी हा क्षण क्वारंटाइनमध्ये बघायला हवा. ज्यामुळे मी या संपूर्ण प्रवासाचा आनंद घेऊ शकेन आणि हा आनंद साजरा करू शकेन,’असे तिने यावर लिहिले.
गतवर्षी तापसीचे मिशन मंगल, गेम ओव्हर, बिल्ला, सांड की आंख असे चार सिनेमे रिलीज झाले होते. तर थप्पड हा याचवर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम तापसीच्या सिनेमावरही झाला. पण या पाचही सिनेमात तापसीने तिच्या अभिनयातून सर्वांची मनं जिंकली आहेत.
तापसीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर तिच्याकडे ‘रॉकेट रश्मी’ आणि ‘हसीन दिलरुबा’ असे अनेक चित्रपट आहेत.