'मी अशाच लग्न सोहळ्याला जाईन जिथे...', तापसी पन्नूने सांगितलं अंबानी वेडिंगला न जाण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 11:35 AM2024-07-14T11:35:28+5:302024-07-14T11:36:35+5:30

नुकतंच तापसीने लग्नाला न जाण्याचं कारण सांगितलं.

Taapsee Pannu reveals why she did not attend Ambani wedding says weddings are personal | 'मी अशाच लग्न सोहळ्याला जाईन जिथे...', तापसी पन्नूने सांगितलं अंबानी वेडिंगला न जाण्याचं कारण

'मी अशाच लग्न सोहळ्याला जाईन जिथे...', तापसी पन्नूने सांगितलं अंबानी वेडिंगला न जाण्याचं कारण

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकला. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे या लग्नाकडे कोणी कोणी पाठ फिरवली? सैफ-करीना, विराट-अनुष्कासह काही सेलिब्रिटींची लग्नाला गैरहजेरी होती. यामध्येच एक नाव आहे अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu). नुकतंच तापसीने लग्नाला न जाण्याचं कारण सांगितलं.

तापसी पन्नूचं एका पॉडकास्टमधलं वक्तव्य व्हायरल होतंय. व्हिडिओत तापसीला प्रश्न विचारण्यात येतो की, 'अंबानींच्या लग्नाला तू जाणार आहेस का?' यावर आधी तर तापसी हसते. मग म्हणते, "नाही. यार,  मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही. मला वाटतं लग्न हा फार वैयक्तिक सोहळा आहे. त्यांचा नक्कीच मोठा मित्रपरिवार असेल पण मी अशाच लग्नसोहळ्यांना जाण्यास प्राधान्य देईल जिथे काही प्रमाणात का होईना संबंधित कुटुंबीय आणि पाहुण्यांमध्ये संवाद होईल.

Tapsee about attending Ambani wedding
byu/AmbassadorNew1257 inBollyBlindsNGossip

तापसी पन्नू ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तसंच बॉलिवूडचा भाग असूनही ती गटात राहणं पसंत करत नाही. तिचं स्वत:चं एक वेगळं विश्व ती निर्माण करते. अंबानींच्या लग्नाला जिथे बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती तिथे न जाता तापसीने आपण त्यांना ओळखत नसल्याचं प्रामाणिकपणे मान्य केलं. तिच्या या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

Web Title: Taapsee Pannu reveals why she did not attend Ambani wedding says weddings are personal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.