Shabaash Mithu Teaser : तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिट्ठू’चा दमदार टीझर आऊट, सोशल मीडियावर होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:04 IST2022-03-21T14:00:22+5:302022-03-21T14:04:05+5:30
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबाश मिठू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Shabaash Mithu Teaser : तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिट्ठू’चा दमदार टीझर आऊट, सोशल मीडियावर होतेय चर्चा
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबाश मिठू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे, या टीझरमध्ये तापसी पन्नू मिताली राजच्या लूकमध्ये दमदार दिसत आहे.
56 सेकंदांचा टीझर क्रिकेटच्या मैदानापासून सुरू होतो, ज्यामध्ये प्रेक्षकांच्या टाळ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम करत आहेत. प्रत्येकजण भारतीय महिला क्रिकेट संघाला चिअरअप करताना दिसतात.. यानंतर मिताली राजच्या भूमिकेत तापसी पन्नूची झलक पाहायला मिळते. ती मैदानात जाण्यासाठी तयार होते. बॅटिंगसाठी पॅड घालते आणि मग तिची क्रिकेट बॅट उचलते आणि मग मैदानात एन्ट्री करते. यादरम्यान तापसी पन्नूची पाठ दिसत आहे. तिच्या टी-शर्टवर 'मिताली 3' असे लिहिले आहे.
तापसीने टीझर शेअर केला आहे. तापसी पन्नूच्या या पोस्टवर कमेंट करताना रकुल प्रीत सिंहने लिहिले, 'वुहू...' याशिवाय चाहते तापसीच्या या पोस्टवर कमेंट करून अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत.
'शाबाश मिठू' चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज तसेच महिला क्रिकेट संघाच्या आयुष्याभोवती फिरताना दिसणार आहे. मिताली राजने अनेक चढउतारांचा सामना केला पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून तिने स्वत:ला सिद्ध केले आहे.