१० वर्षांच्या डेटिंगनंतर तापसी पन्नू बॉयफ्रेंडबरोबर अडकणार लग्नाच्या बेडीत! पण, बॉलिवूडकरांना निमंत्रणच नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 09:47 AM2024-02-28T09:47:41+5:302024-02-28T09:48:22+5:30
Taapsee Pannu Wedding: तापसी पन्नूची लगीनघाई, बॉयफ्रेंडशी लग्न करत थाटणार संसार
बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतंच रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकले. आता तापसी पन्नूही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. तापसीच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचे सूर घुमू लागणार आहेत. तापसी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तापसी बॉयफ्रेंड आणि बॅडमिंटन खेळाडू मैथियास बो याच्याशी लग्न करत विवाहबंधनात अडकणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तापसी गेल्या १० वर्षांपासून मैथियास बो याला डेट करत आहे. १० वर्षांच्या डेटिंगनंतर आता तापसीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तापसी मार्च महिन्याच्या शेवटी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. राजस्थानमध्ये तापसीचा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचं समजत आहे. पण, तिच्या लग्नाचं बॉलिवूडसेलिब्रिटींना अद्याप निमंत्रण दिलं गेलेलं नाही.
तापसी आणि मैथियास बो यांचा विवाह दोन पद्धतीने होणार आहे. दोन्ही संस्कृतींचा मान ठेवून तापसी मैथियास बो याच्याशी ख्रिश्चन आणि सिंधी पद्धतीने विवाह करणार आहे. गेल्या जवळपास १० वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. पण, त्यांनी त्यांचं हे नातं गुपित ठेवलं होतं. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.