मालदीवमध्ये बहिणी आणि बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय तापसी पन्नू, 'Biggini Shoot' व्हिडीओ होतोय व्हायरल
By गीतांजली | Updated: October 13, 2020 18:35 IST2020-10-13T18:31:17+5:302020-10-13T18:35:28+5:30
विशेष म्हणजे तापसीच्या बॉयफ्रेंडसुद्धा या व्हिडीओत दिसतोय.

मालदीवमध्ये बहिणी आणि बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय तापसी पन्नू, 'Biggini Shoot' व्हिडीओ होतोय व्हायरल
तापसी पन्नू सध्या मालदीवमध्ये आहे. व्हॅकेशनसाठी तापसी एकटीच गेली नसून तिच्या बहिणी शगुन पन्नू आणि इवानिया तिच्यासोबत आहे. तिघीजणी मिळून धम्माल करत आहेत. तापसी मालदीव्जमधले फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे.
तापसीने मालदीव्जमधला एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ तापसी पन्नूने 'बिगिनी शूट' थीमवर बनवला आहे. या व्हिडीओत तापसी बहिणींसोबत मस्ती करताना दिसतेय. विशेष म्हणजे तापसीच्या या व्हिडीओत पहिल्यांदा तिचा बॉयफ्रेंड आणि बॅडमिंटन प्लेअर मेथियास बोसुद्धा दिसतो आहे. हे गाणं सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे. नेटकऱ्यांसह सेलेब्सनेही तापसीच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा केल्या आहेत. या व्हिडाओवर अनुष्का शर्मा, वरुण धवन आणि भूमी पेडणेकरने मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे काही महिने घरातच बंदिस्त असल्यामुळे प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा आहे. तसेच लॉकडाऊनपूर्वीही नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढणे तसेही अवघडच होते. त्यामुळे कोरोनाकाळातही तापसी मस्त हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.
पंजाबी घरात जन्मास आलेल्या तापसीने 2010 मध्ये ‘झुम्माण्डि नादां’ या तेलगू चित्रपटातून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ती ओळखली जाते. शेवटची तापसी अनुभव सिन्हा यांच्या धप्पडमध्ये दिसली होती. यानंतर तापसी आता 'रश्मि रॉकेट' आणि 'शाबाश मितू'मध्ये दिसणार आहे.