...म्हणून 'तारे जमीन पर' सिनेमातील गाण्यात आहेत पहाडी शब्दांचा भऱणा'; प्रसून जोशींनी सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:57 PM2022-06-06T17:57:15+5:302022-06-06T17:58:08+5:30

Prasoon Joshi: 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. यावेळी प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, प्रसून जोशी यांनी तारे जमीन पर चित्रपटाचा किस्सा सांगितला.

Taare Zameen Par movie song lyrics Prasoon Joshi | ...म्हणून 'तारे जमीन पर' सिनेमातील गाण्यात आहेत पहाडी शब्दांचा भऱणा'; प्रसून जोशींनी सांगितलं खरं कारण

...म्हणून 'तारे जमीन पर' सिनेमातील गाण्यात आहेत पहाडी शब्दांचा भऱणा'; प्रसून जोशींनी सांगितलं खरं कारण

googlenewsNext

17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Mumbai International Film Festival) नुकताच पार पडला. वरळीतील नेहरु सेंटर येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गजांनीा हजेरी लावली होती. यावेळी प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, पटकथा लेखक आणि संवाद तज्ज्ञ प्रसून जोशी यांनीही उपस्थिती दर्शविली. प्रसून जोशी यांनी या कार्यक्रमात 'द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग' या विषयावर मास्टरक्लास याविषयी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी प्रत्येक माणूस एक अलिखित स्टोरी आहे, असं ते म्हणाले. तसंच त्यांनी 'तारे जमीन पर' चित्रपटाविषयीदेखील भाष्य केलं.

“तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून जेव्हा स्टोरी, कविता, संवाद लेखन करत असता तेव्हा त्या ठिकाणाचा प्रभाव तुमच्या लेखनावर नेहमीच पडत असतो. मी जेव्हा 'तारे जमीं'पर लिहित होतो, तेव्हा मी पहाडी भागात होतो. त्यामुळे तुम्हाला त्यात पहाडी शब्द अनेक दिसतील. शब्द आणि रूपके आपल्या मुळापासून नेहमीच वाहत असतात. एखाद्याने स्वत: ला त्याच्या मुळांपासून आणि वास्तविकतेपासून वेगळे करू नये कारण, त्याचा आपल्या लेखन शैलीवर खूप प्रभाव पडतो आणि सुंदर शब्द आणि रूपके आणण्यास मदत होते," असं 'प्रसून जोशी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “आज आपल्याकडे अनेक चित्रपट निर्माते आहेत जे दर्जेदार चित्रपट बनवत असतात. पण, आपल्याकडे असेही काही चित्रपट निर्माते आहेत जे ओढून ताणून कलाकृती बनवत असतात. त्यामुळे मला वाटतं चित्रपट निर्मिती सोपी असली पाहिजे, जेणेकरून तरुणांची सर्व स्वप्ने आणि कथा जिवंत होतील. चित्रपट निर्मिती ही धैर्याने नव्हे, तर प्रतिभेने चालविली पाहिजे. अंतिम सत्य समजून घेणे फार कठीण आहे. प्रत्येकाची एक वेगवेगळी आकलन शक्ती असते. त्यामुळे एखादा विषय अनेक लोकं आपआपल्या परीने तो वेगवेगळ्या अॅंगलने समजून घेत असतात. प्रत्येकाचा एक अद्वितीय आणि अस्सल सोयीस्कर बिंदू असतो. आपण सर्वत्र असू शकत नाही, म्हणून आपण आपल्या दृष्टीकोनातून या विषयाकडे पाहिले पाहिजे. यामुळे कथा रंजक आणि आकर्षक होईल."

Web Title: Taare Zameen Par movie song lyrics Prasoon Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.