तब्बूची सख्खी बहिण एकेकाळची होती फेमस अभिनेत्री, आता दिसते अशी, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 09:00 PM2019-11-10T21:00:00+5:302019-11-10T21:00:00+5:30
तब्बूची सख्खी बहिण एकेकाळची होती फेमस अभिनेत्री, २००५ सालापासून बॉलिवूडमधून आहे गायब
बॉलिवूडमध्ये असे बरेच फेमस सेलिब्रेटी आहेत ज्यांचे बहिण भाऊचे सिनेइंडस्ट्रीशी एकेकाळी संबंध होता. अशाच सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री तब्बूचाही समावेश आहे. फार कमी लोकांना माहित असेल की अभिनेत्री फरहा नाज तब्बूची सख्खी बहिण आहे.
फरहा देखील एकेकाळची बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने २००५ सालानंतर बॉलिवूडला रामराम केला.
फरहाने बॉलिवूडमध्ये जवळपास २० वर्षे काम केलं. त्यानंतर तिने सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला. तिने तिच्या करियरची सुरूवात फासले चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत महेंद्र कपूरचा मुलगा रोहन कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता.
मात्र या चित्रपटानंतर फरहाला मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या.
या चित्रपटात 'नसीब अपना अपना', 'मरते दम तक', 'ईमानदार', 'घर घर की कहानी', 'हमारी खानदान', 'बाप नंबरी दस नंबरी' व 'मुकाबला' या चित्रपटांचा समावेश आहे.
करियरमध्ये यशस्वी झाल्यानंतर फराहने बिंदू दारा सिंगसोबत लग्न केले. या दोघांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर फराहने २००३ साली छोट्या पडद्यावरील अभिनेता सुमीत सहगल सोबत विवाह केला.
सध्या ते दोघं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत.
मात्र ती सिनेइंडस्ट्रीतून बराच काळ गायब असून शेवटची ती २००५ साली शिखर या चित्रपटात झळकली होती.