​‘गोलमाल4’मध्ये तब्बू करणार कॉमेडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 07:29 AM2017-01-31T07:29:24+5:302017-01-31T12:59:24+5:30

‘गोलमाल’ सीरिजचा चौथा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगण आणि रोहित शेट्टी ही हिट ...

Taboom 4 in 'Golamal 4' comedy! | ​‘गोलमाल4’मध्ये तब्बू करणार कॉमेडी!

​‘गोलमाल4’मध्ये तब्बू करणार कॉमेडी!

googlenewsNext
ोलमाल’ सीरिजचा चौथा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगण आणि रोहित शेट्टी ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्याशिवाय ‘गोलमाल4’मध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. हे नाव म्हणजे तब्बू. होय, तब्बू ‘गोलमाल4’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

खरे तर तब्बू गंभीर भूमिकांसाठी ओळखली जाते. याऊलट ‘गोलमाल4’ म्हणजे धम्माल कॉमेडी असणार आहे. अशास्थितीत या चित्रपटासाठी तब्बूची निवड होणे थोडेचे अचंबित करणारे आहे. पण यामागचे खरे कारण आहे, अजय देवगण. होय, चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणच्या म्हणण्यावरून या चित्रपटात तब्बूला घेण्यात आले. अजय व तब्बू दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांनी  याआधीही सोबत काम केले आहे. त्यामुळे अजयने तब्बूचे नाव सुचवणे, यात तसे काहीही आश्चर्य नाही. मला या चित्रपटासाठी एक सशक्त अभिनेत्री हवीयं, असे रोहितने अजयला सांगितले आणि अजयने लगेच रोहितला तब्बूचे नाव सुचवले. ही आॅफर तब्बूपर्यंत पोहोचली आणि तिनेही आनंदाने स्वीकार केली. अजयसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळत असेल तर मला आनंदचं होईल. ‘गोलमाल’ सीरिजची मी मोठी चाहती आहे,असे तब्बू याबद्दल म्हणाली.

एका कॉमेडी चित्रपटात तब्बू काम करतये, हे थोडं आश्चर्यकारक नाही का? असा प्रश्न तब्बूला विचारण्यात आला. यावर तब्बूने अतिशय सुंदर उत्तर दिले. कुठलीच व्यक्ती सदासर्वकाळ हसू शकत नाही. माझ्या जवळच्या व्यक्तिंना माझी विनोदबुद्धी ठाऊक आहे. शिवाय मी अगदी सहज हसू शकते, असे तब्बू यावर म्हणाली. शिवाय याबद्दलचा एक किस्साही शेअर केला. तिने सांगितले की, हैदराबादेत मी थिएटरमध्ये ‘ओम शांती ओम’बघायला गेले होते. प्रेक्षकांमध्ये माझी बहीणही कुठेतरी बसलेली होती. ती तिच्या मित्रांसोबत आली होती. मला हे ठाऊक नव्हते. मी या शोदरम्यान नुसते हसत सुटले होते. माझ्या हसण्याचा आवाज ऐकून मी सुद्धा चित्रपट पाहायला आलेय, हे तिला कळले. मी हसू शकते आणि हसवू सुद्धा शकते. आता तब्बूचे या वाक्याची खात्री आपल्याला ‘गोलमाल4’ बघितल्यानंतरच पटणार आहे, हे मात्र नक्की.

Web Title: Taboom 4 in 'Golamal 4' comedy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.