तब्बूने नाकारला सिनेमा, अन् विद्या बालनचं फळफळलं नशीब, आता 'मंजुलिका' बनून करतेय कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 17:24 IST2024-01-18T17:23:39+5:302024-01-18T17:24:10+5:30
गेल्या काही दिवसांपासून 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) सिनेमाच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहे. या चित्रपटाची शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे.

तब्बूने नाकारला सिनेमा, अन् विद्या बालनचं फळफळलं नशीब, आता 'मंजुलिका' बनून करतेय कमबॅक
गेल्या काही दिवसांपासून 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) सिनेमाच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहे. या चित्रपटाची शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) तिसऱ्या भागात मंजुलिका बनून कमबॅक करणार आहे. तिचे चाहते तिला पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३'बद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तसेच यावेळी चित्रपटात कोण दिसणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहोत. सध्या असे वृत्त आहे की, या चित्रपटाचे शूटिंग मार्चमध्ये सुरू होणार आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात आणखी उत्साह वाढणार असून त्यात अनेक ट्विस्टही येणार असल्याचे बोलले जात आहे.
विद्या बालनचे पुनरागमन
भूल भुलैयाच्या पहिल्या भागानंतर विद्या तिसऱ्या चित्रपटात मंजुलिकाच्या भूमिकेत परतत आहे. निर्मात्यांनी विद्या बालनची समजूत घातल्याचे वृत्त आहे. विद्या बालनला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती आणि ती ही भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. 'भूल भलैया २' नाकारलेली विद्या बालन आता 'भूल भलैया ३'मधून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तब्बूने 'भूल भलैया ३'मध्ये भूमिका करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. तिला त्याच भूमिकांची पुनरावृत्ती करायची नाही, असे तिने सांगितले. मात्र, या चित्रपटातील मुख्य नायिकेचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
ही अभिनेत्री असेल मुख्य भूमिकेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. मात्र, चित्रपटाची टीम अनेक नावांवर विचार करत असून अद्याप कोणतेच नाव फायनल झालेले नाही. या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीचे नावही फेब्रुवारीपर्यंत फायनल होणार असल्याचे बोलले जात आहे.