कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या फोटोतील या मुलीला ओळखलंत का? सध्या कुठे आहे, काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 08:00 AM2022-02-16T08:00:00+5:302022-02-16T08:00:02+5:30
Bollywood Throwback : ती आली आणि थोडी थोडकी नव्हे तर सुमारे 20 वर्ष इंडस्ट्रीत वावरली आणि यानंतर अचानक लग्न करून इंडस्ट्रीतून गायब झाली झाली.
बॉलिवूडमध्ये काही जण येतात, आपलं अस्तित्व गाजवतात आणि मग अचानक गायब होतात. अभिनेत्री फराह नाज (Farah Naaz) यापैकीच एक. तिची आणखी एक ओळख द्यायची झाल्यास फराह म्हणजे, तब्बूची (Tabu) बहिण.
80 व 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये फराह अॅक्टिव्ह होती. ती आली आणि थोडी थोडकी नव्हे तर सुमारे 20 वर्ष इंडस्ट्रीत वावरली. नसीब अपना अपना, यतीम, ईनामदार, घर धर की कहानी अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. पण इतकी वर्ष इंडस्ट्रीला दिल्यानंतरही तिला म्हणावं तसं यश लाभलं नाही. यानंतर अचानक लग्न करून ती इंडस्ट्रीतून गायब झाली झाली. विंदू दारा सिंगसोबत लग्न करून ती संसारात रमली. अर्थात हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.
विंदू दारा सिंग आणि फराह यांची ओळख नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विंदू आणि फराह एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले. पण दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते. फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावं अशी तिच्या घरातील लोकांची इच्छा होती तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने संसार थाटावा, अशी विंदू दारा सिंगच्या घरच्यांना वाटत होतं. अखेर घरच्यांच्या मर्जीखातर फराह व विंदू दोघांनीही ब्रेकअपचा निर्णय घेतला.
ब्रेकअप करू, असं सांगू विंदू त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तामीळनाडूला गेला. या काळात ना दोघांचाही एकमेकांशी संपर्क नव्हता. पण हाच दुरावा दोघांना पुन्हा एकत्र घेऊन आला. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे दोघांनाही जाणवलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आधी विरोध करणाऱ्या कुटुंबियांनी देखील या लग्नासाठी परवानगी दिली. लग्नानंतर वर्षभरात विंदू व फराहच्या घरी पाळणा हलला. सुरूवातीची काही वर्ष आनंदात गेलीत. पण अचानक दोघांत बिनसलं. इतकं की, 2002 मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली आणि यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
2003 मध्ये फराहने अभिनेता सुमीत सहगलसोबत दुसऱ्यांदा संसार थाटला.आता ती आपल्या पतीसमवेत मुंबईत राहते आणि त्याच्या डबिंग कंपनीत त्याला मदत करते.
फराह इंडस्ट्रीमध्ये तिच्या रागीट स्वभावामुळे ओळखली जात होती. असं म्हणतात की, ती कधी कोणावर हात उगारेल हे सांगणे फार कठीण होते. मीडिया रिपोर्टनुसार फराहने ‘कसम वरदी की’ या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता चंकी पांडे यालादेखील मारहाणही केली होती. जेपी दत्तांच्या पार्टीत तिने एका निर्मात्यालाही काशिलात लगावली होती.