ताहिरा कश्यपची खास पोस्ट, रोमँटिक फोटो शेअर करत आयुष्मानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 04:09 PM2023-09-14T16:09:07+5:302023-09-14T16:11:40+5:30

ताहिरा कश्यपनेही आयुष्मानला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tahira Kashyap shared a special romantic photo with Ayushmann | ताहिरा कश्यपची खास पोस्ट, रोमँटिक फोटो शेअर करत आयुष्मानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Tahira Kashyap-Ayushmann

googlenewsNext

अभिनेता आयुष्मान खुरानाचा आज ३९ वा वाढदिवस. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या खास प्रसंगी पत्नी ताहिरा कश्यपनेही आयुष्मानला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आयुष्मानची पत्नी ताहिराने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे. ताहिराने पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझ्या सोलमेटला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू एकटाच आहेस ज्याच्यासोबत मी पहाटे ४ वाजेपर्यंत डान्स करु शकते आणि असं आपण केलेही आहे. तु प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणतोस. तुझ्यासारखा दुसरं कोणीही नाही'. 

 ताहिराने रोमँटिक फोटो शेअर केलेत. या फोटोत त्यांची केमिस्ट्री दिसून आली. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ताहिराने साडी नेसलेली दिसत आहे. तर आयुष्मान काळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. आयुष्मानने ताहिराच्या या पोस्टवर कमेंट करून आभार मानले. ताहिराने सोशल मीडियावर ही पोस्ट करताच अनेक सेलेब्स आणि चाहत्यांनी त्यावर कमेंट्सही केल्या.

आयुषमानची पत्नी ताहिरासोबतची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. जवळपास ११ वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि २०११ मध्ये लग्न केले. ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. शिवाय, या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

Web Title: Tahira Kashyap shared a special romantic photo with Ayushmann

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.