तर तो रिअॅक्ट होणारच..., तैमूरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकलं खान कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:38 PM2022-05-11T12:38:37+5:302022-05-11T12:41:10+5:30
Taimur Ali Khan : सैफ अली खान करिना कपूर खानचा मुलगा तैमूर अली खानचं स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर अगदी जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये आला. पण गेल्या काही दिवसांपासून तैमूर ट्रोल होतोय.
सैफ अली खान(Saif Ali Khan) व करिना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) मुलगा तैमूर अली खानचं (Taimur Ali Khan)स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर अगदी जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये आला. आजही त्याचा व्हिडीओ वा फोटो पडला रे पडला की, सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल होतो. अनेक लोक तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. गेल्या काही दिवसांपासून तैमूर ट्रोल होतोय. फोटोग्राफर्सने फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता तैमूर ‘बंद करो’, असं म्हणत त्यांच्यावर चवताळला होता. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून लोकांनी तैमूरला ट्रोल केलं होतं. अगदी त्याच्या अम्मी-अब्बूचे संस्कार काढले होते. खान कुटुंबाने आत्तापर्यंत यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता सैफची बहिण सोहा अली खानचा पती कुणाल खेमूनं तैमूरला ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. तैमूरची आत्या सबा अली खान ही सुद्धा संतापली आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुणाल तैमूरला ट्रोल करण्यांवर बसरला. ‘तैमूर आधी खूप लहान होता. पण आता तो मोठा होतोय. त्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर तो बोलणार, चिडणार. मुलं मनात येईल तसे वागतात. रिअॅक्ट होतात. यात तैमूरचा दोष नाही तर समोरच्या व्यक्तिची चूक आहे. तुम्ही त्याला आवडत नसताना त्याचे फोटो घ्याल तर तर तो रिअॅक्ट होणारच. यावरून तैमूरला ट्रोल करणाऱ्यांना खरं तर बदलण्याची गरज आहे,’असं कुणाल खेमू म्हणाला.
सैफची बहिण व तैमूरची आत्या सबा खान हिने देखील इन्स्टास्टोरीवर याबद्दल लिहिली. ती म्हणाली, ‘ आम्ही तैमूरचे फॅन आहोत, आम्ही त्याला फॉलो करतो, असं ऐकून मला आश्चर्य वाटायचं. कारण तो तेव्हा अगदी एक वर्षाचा होता. आता लोक त्याला ट्रोल करतात, हे बघून मी हैराण आहे. तो 5 वर्षाचा मुलगा आहे आणि ट्रोलिंगचा अर्थ माहित नसलेल्या इतक्या लहान मुलाला लोक ट्रोल करत आहेत. मुलं मोठी होत आहेत, ते बदलणार. शिकणार, त्यांना त्यांच्यासारखं वागू द्या. तुम्हाला प्रशंसक वा टीकाकार होण्याची गरज नाही.’