तैमूरच्या नॅनीने अनंत अंबानींचाही केलाय सांभाळ, रिसेप्शनचे फोटो पोस्ट करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:03 PM2024-07-17T12:03:20+5:302024-07-17T12:04:56+5:30

अनंत अंबानींचा लहानपणीचा फोटो शेअर करत जागवल्या आठवणी

Taimur s nanny Lalita Dsilva also took care of Anant Ambani in his childhood posted photos of the reception | तैमूरच्या नॅनीने अनंत अंबानींचाही केलाय सांभाळ, रिसेप्शनचे फोटो पोस्ट करत म्हणाल्या...

तैमूरच्या नॅनीने अनंत अंबानींचाही केलाय सांभाळ, रिसेप्शनचे फोटो पोस्ट करत म्हणाल्या...

सैफ अली खान आणि करिना कपूरची लाडकी मुलं तैमूर (Taimur)आणि जेह (Jeh) सोशल मीडियावर चर्चेत असतात. इतकंच नाही तर त्या दोघांना सांभाळणारी त्यांची नॅनीही लाईमलाईटमध्ये असते. तैमूर आणि जेहसोबतच त्यांच्या नॅनीचेही फोटो व्हायरल होत असतात. ललिता डिसिल्व्हा (Lalita Dsilva) असं नॅनीचं नाव आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटच्या नुकत्याच झालेल्या रिसेप्शन सोहळ्याला जिथे सैफ-करीना येऊ शकले नाही तिथे तैमूरची नॅनी म्हणजेच ललिता डिसिल्व्हा आल्या होत्या. याचं कारण म्हणजे ललिता या काही वर्षांपूर्वी अनंत अंबानींच्या नॅनी होत्या.

ललिता डिसिल्व्हा यांनी इन्स्टाग्रामवर अनंत अंबानींसोबत फोटो शेअर केला आहे. त्या लिहितात, "अंबानी फॅमिली आणि अनंत बाबा यांनी मला आयुष्यात दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी त्यांची आभारी आहे. या कुटुंबासोबत घालवलेल्या सुंदर आठवणी आजही ताज्या आहेत. इतक्या वर्षांनंतरही, त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि आपुलकी तशीच आहे जी मला प्रेरित करते. नीता अंबानी आणि मुकेश सर आजही मला त्यांच्या आयुष्याचा भाग समजतात हे पाहून मी धन्य झाले. अनंत आणि राधिका यांचा संसार सुखाचा होवो अशी मी प्रार्थना करते. अंबानी कुटुंबाचं प्रेम आणि त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी सर्वकाही आहे." 

यासोबतच ललिता यांनी अनंत अंबानींचा लहानपणीचा फोटो शेअर करत लिहिले, 'पॅरिसच्या डिझ्नी वर्ल्डमध्ये फिरताना मी आणि अनंत अंबानी. इथूनच माझ्या बेबी केअर जॉबला सुरुवात झाली होती. अनंत लहानपणी खूप समजूतदार होता. आजही तो कुटुंबात आणि सोशल ग्रुपमध्ये सर्वांचा लाडका आहे. आज त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे. अनंत आणि राधिकाला शुभेच्छा."

ललिता डिसिल्व्हा तैमूर आणि जेहनंतर आता साऊथ अभिनेता रामचरण तेजाच्या मुलीचा सांभाळ करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर सेलिब्रिटींसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जेहसोबत त्यांचे जास्त फोटो आहेत. जेह बाबा त्यांचा लाडका असल्याचं दिसतंय.

Web Title: Taimur s nanny Lalita Dsilva also took care of Anant Ambani in his childhood posted photos of the reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.