तैमुरनं विराजमान केले गणपती बाप्पा, शांतता अन् सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:03 PM2020-08-22T14:03:01+5:302020-08-22T14:03:11+5:30
सामाजिक संदेश देत, आरोग्य धनसंपदेचा मंत्र सांगत यंदाच गणेशोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात झाल्यापासून बहुधा यंदा प्रथमच निर्बंधासह गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ भक्तांवर आली आहे. कोरोनामुळे सण साजरा करण्यावर बंधने आली असली तरी गणेशभक्तांच्या उत्साहात तीळभरही कमतरता दिसून आली नाही. गणपती ही बुद्धीची देवता, त्यामुळे तिच्या स्वागतासाठी, सगळी बंधने पाळून गणेशभक्तांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या आहेत. फेमस बॉलिवूड कीड्स असलेल्या तैमुरनेही गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान केले आहेत. करिना कपूर फॅन या ट्विटर अकाऊंटवरुन बाप्पांचे दर्शन घेतानाचा तैमुरचा फोटो शेअर केला आहे.
सामाजिक संदेश देत, आरोग्य धनसंपदेचा मंत्र सांगत यंदाच गणेशोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशात कोरोनाचे संकट असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात ढोल-बाजा-ताशांचा आवाज नाही. सार्वजनिक ठिकाणी मंडपात विराजमान झालेला बाप्पाही नाही. मात्र, गणेशभक्तांचा उत्साह तेवढाच आहे. गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांची जय्यत तयारी दिसून येत आहे. तर, सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान होत आहेत.
"Ganpati celebrations might be a little different this year... But Tim made sure the festival was on point by making a beautiful lego Ganeshji for us ❤️💯. Wishing you all a very happy Ganesh Chaturthi. Praying for peace, everyone's health and safety." - Kareena Kapoor Khan pic.twitter.com/4IMzSKRr0f
— Kareena Kapoor Khan (@KareenaK_FC) August 22, 2020
अभिनेत्री करिना कपूरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बाप्पांचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, सैफ अन् करिनाचा मुलगा तैमुरने गणपती बाप्पा विराजमान केल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाचं आगमन थोडसं वेगळ्या पद्धतीने आहे, पण टीमने निश्चित केलंय की, हा उत्सव आपल्यासाठी गणेशजी सुंदर लेगो बनवतील. आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बाप्पा आपल्या सर्वांना शांती, उत्तम आरोग्य आणि स्वास्थ देईल, अशी प्रार्थनाही करिनाने केली आहे. करिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. तर, करिना कपूर फॅन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा मजकूर शेअर करण्यात आलाय.