हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा, मुलासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली नताशा स्टेन्कोविक, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:54 IST2024-07-17T12:53:43+5:302024-07-17T12:54:38+5:30
Natasha Stankovic : सध्या नताशा स्टेन्कोविक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती तिच्या मुलासोबत विमानतळावर स्पॉट झाली.

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा, मुलासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली नताशा स्टेन्कोविक, फोटो व्हायरल
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्यात सर्व काही ठीक नाही. हे कपल बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसत नाहीये. तसेच दोघेही एकमेकांबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे लोकांना वाटते की हे कपल वेगळे होणार आहे. नताशा आणि हार्दिक या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत होत्या मात्र अद्याप दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हार्दिकपासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान नताशा तिचा मुलगा अगस्त्यसोबत फिरायला गेली आहे. ती तिच्या मुलासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली.
नताशा विमानतळावर मुलगा अगस्त्यचा हात धरताना दिसली. तिने दुसऱ्या हाताने बॅग धरली होती. विमानतळावर जाण्यापूर्वी नताशाने इन्स्टाग्रामवर कुठेतरी जाण्याबाबत इशारा दिला होता. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बॅगचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की ही वर्षातली ती वेळ आहे.
नताशा आणि अगस्त्याला मुंबई सोडून जाताना पाहून दोघेही सर्बियाला गेल्याचे लोकांना वाटत आहे. मात्र, नताशाने अद्याप स्पष्ट केलेले नाही की ती आपल्या मुलाला कुठे घेऊन जात आहे. अलीकडेच हार्दिकने विश्वचषक जिंकून परतल्यानंतर मुलगा अगस्त्यासोबतचे फोटो शेअर केले होते. हे सेलिब्रेशनचे फोटो होते. या फोटोंमध्ये नताशा कुठेही दिसली नाही. गेल्या काही दिवसांपासून नताशा सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करत आहे ज्यामध्ये ती अप्रत्यक्षपणे नातेसंबंध किंवा लोकांबद्दल बोलताना दिसत आहे.