तमन्ना भाटियाने 'जी करदा 'वेबसिरीजमधील इंटिमेट सीन्सवर सोडलं मौनं, म्हणाली- ते गरजेचं होतं..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:29 PM2023-06-20T13:29:57+5:302023-06-20T13:34:30+5:30
इंटिमेट सीनमुळे तमन्ना सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. यावर आता अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच तमन्नाने अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याचं जाहीरपणे मान्य केलं. तेव्हापासून ती चर्चेत येत आहे. आता तमन्ना तिच्या 'जी करदा 'वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसिरीजमध्ये तमन्नाने सुहेल नय्यरसोबत इंटिमेट सीन दिले आहेत. ज्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे. जी करदाची कथा लग्नाच्या गुंतागुंतीवर आधारित आहे. तमन्नाने पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर इतके इंटिमेट सीन्स दिले आहेत. इंटिमेट सीनमुळे तमन्ना सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. यावर आता अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.
तमन्नाने दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, हा सीन त्या लोकांचा प्रवास दाखवण्यासाठी गरजेचा होता. जेव्हा तुम्ही कोणताही रिलेशनशीप ड्रामा बघता तेव्हा तो त्यातला एक महत्त्वाचा पैलू असतो, कारण ते सत्य असते. 'लोकांना आवडो किंवा न आवडो, हे असेच आहे. सुहेलने हा सीन माझ्यासाठी सोप्पा केला. मला वाटते की आम्हा दोघांना हे समजले आहे की हे लोक एकमेकांना अशा प्रकारे ओळखतात. सेटवर आमचा एक इंटिमसी को-ऑर्डिनेटर होता पण अरुणिमाने आम्हा दोघांसाठी ते खूप सोयीस्कर बनवले.
तमन्नाने तिच्या लस्ट स्टोरीज २मध्ये पहिल्यांदाच किसिंग सीन देत तिने स्वत: तयार केलेला रुल तोडला होता. यावेळी देखील अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती. यावर बोलताना तमन्ना म्हणाली होती, "मी आजवर कधीही इंटिमेट सीन दिले नाहीत तरीदेखील या भूमिकेसाठी सुजॉय घोष यांनी माझी निवड केली याचं मला खूप कौतुक आहे. पडद्यावर मला रोमान्स करताना प्रेक्षकांना नक्कीच संकोचल्यासारखं वाटलं असं मला वाटायचं. म्हणून मी किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता". 'लस्ट स्टोरीज २'मध्ये केवळ कथेची गरज म्हणून मी ते सीन दिले, असंही तिने सांगितलं.