तमन्ना भाटियाने डिलीट केले राधाच्या रुपातील ते Photos, समोर आलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:07 PM2024-09-05T16:07:41+5:302024-09-05T16:08:21+5:30

गोकुळाष्टमीला 'राधा' च्या रुपातील केलेलं फोटोशूट तमन्नाने का केलं डिलीट?

Tamannaah Bhatia deleted photoshoot which she done for gokulashtami where she bacame Radha | तमन्ना भाटियाने डिलीट केले राधाच्या रुपातील ते Photos, समोर आलं खरं कारण

तमन्ना भाटियाने डिलीट केले राधाच्या रुपातील ते Photos, समोर आलं खरं कारण

तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) सध्याची सर्वात आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिची कमालीची फॅन फॉलोइंग आहे. तमन्नाने गोकुळाष्टमीला राधा चा गेटअप करत सुंदर फोटोशूट केलं होतं. तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. अनेकांना हे फोटो खूप आवडले होते.  मात्र आता तिने ते डिलीट केले आहेत. यामागचं काय कारण असेल वाचा.

तमन्ना भाटियाने फॅशन डिझायनर करण तौरानीसाठी हे फोटोशूट केलं होतं. करण तौरानीच्या या कँपेनचं नवा 'लीला: द डिवाइन इल्यूजन ऑफ लव्ह' असं होतं. यामध्ये राधा कृष्माच्या प्रेमाचे अनेक रंग दाखवण्यात आले होते. तमन्ना भाटिया राधाच्या रुपात खूप सुंदर दिसत होती. मात्र तिने घातलेले कपडे खूपच रिव्हीलिंग असल्याचं अनेकांना वाटलं आणि तिला जोरदार ट्रोल करण्यात आलं. 'स्वत:च्या फायद्यासाठी आमच्या प्रेमळ राधा कृष्णाच्या पवित्र नात्याला सेक्शुलाईज करणं बंद करा.  तुम्ही मूर्ख आहात, हिंमत कशी झाली?'  एकाने तमन्नाचा व्हिडिओ शेअर करत ही कमेंट केली होती. 


कपड्यांवरुन ट्रोल झाल्याने अखेर तमन्नाने ते फोटो डिलीट केल्याचं आता दिसून येतंय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ते फोटो गायब आहेत. तमन्नाकडून अद्याप यावर अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र तिने फोटो डिलीट केल्याने हे ट्रोलिंगमुळेच केल्याचं स्पष्ट होतंय.

तमन्ना भाटियाने नुकतंच 'स्त्री 2' सिनेमात आयटम साँग केलं. यासाठी तिचं खूप कौतुक होत आहे. सध्या तिच्या एकूणच अदांवर चाहते फिदा आहेत. शिवाय तमन्ना सध्या अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्यानेही चर्चेत आहे.

Web Title: Tamannaah Bhatia deleted photoshoot which she done for gokulashtami where she bacame Radha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.