विजयसोबत ब्रेकअप होताच तमन्नाला मिळाला दुसरा प्रियकर, खुल्लमखुल्ला लग्नासाठी घातली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:45 IST2025-03-21T10:44:54+5:302025-03-21T10:45:55+5:30
विजय वर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर एका व्यक्तीने अभिनेत्रीला थेट लग्नाची मागणी घातली आहे.

विजयसोबत ब्रेकअप होताच तमन्नाला मिळाला दुसरा प्रियकर, खुल्लमखुल्ला लग्नासाठी घातली मागणी
दक्षिण चित्रपटसृष्टी ते बॉलिवूड असं नाव गाजवणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia). तमन्ना तिच्या चित्रपटांमुळे तर चर्चेत असतेच. पण, सध्या ती तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. तमन्ना गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता विजय वर्मा याला डेट करत होती. पण, अलिकडेच दोघांचं ब्रेकअप (Tamannaah Bhatia Breakup Rumors With Vijay Varma) झाल्याची चर्चा रंगली आहे. अशातच विजय वर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर एका तरुणाने अभिनेत्रीला थेट लग्नाची मागणी घातली आहे.
तमन्ना एका पुरस्कार सोहळ्याला पोहचली होती. तेव्हा चाहत्यांनी तिला वेढलं. यावेळी गर्दीतील एका तरुणाने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. यामध्ये तमन्ना तिच्या चाहत्यांना भेटताना आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसतेय. मग तिची नजर हातात पोस्टर धरलेल्या एका व्यक्तीवर पडते. पोस्टरमध्ये तमन्नाचा फोटो आणि त्यावर लिहलं होतं 'माझ्याशी लग्न कर तमन्ना'. हे पोस्टर पाहातचा तमन्नाला हसू आलं. तिनं चाहत्याशी संवाद साधला. यावेळी पांढऱ्या रंगाचा गाऊनमध्ये तमन्ना ही प्रचंड सुंदर दिसत होती.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी कधीही त्यांचं नातं लपवलं नाही आणि नेहमीच एकमेकांवर उघडपणे प्रेमाचा वर्षाव केलाय. दोघेही २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडीने नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज २' मध्ये सुजॉय घोषच्या सेगमेंटमध्ये एकत्र काम केले होते. जून २०२३ मध्ये फिल्म कंपॅनियनला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने अखेर विजयसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली. नंतर विजय वर्मानेही त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. आता दोघांचे ब्रेकअप झाल्याची फक्त चर्चा आहे. या दोघांनीही आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.