तमन्ना भाटिया 'ईडी'च्या रडारवर, तब्बल 8 तास कसून चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 09:17 AM2024-10-18T09:17:49+5:302024-10-18T09:18:42+5:30

आता अभिनेत्रीच्या चौकशीनंतर कोणती गोष्ट समोर येईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Tamannaah Bhatia gets questioned by ED in Guwahati over Mahadev betting app case | तमन्ना भाटिया 'ईडी'च्या रडारवर, तब्बल 8 तास कसून चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण?

तमन्ना भाटिया 'ईडी'च्या रडारवर, तब्बल 8 तास कसून चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची ( Tamannaah Bhatia ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी कसून चौकशी केली. तमन्नाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात तब्बल ८ तास चौकशी सुरु होती. आता अभिनेत्रीच्या चौकशीनंतर कोणती गोष्ट समोर येईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

रिपोर्टनुसार, HPZ ॲपवर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सामने बेकायदेशीरपणे पाहण्याचा प्रचार केल्याच्या आरोपावरून तमन्नाला ईडीने समन्स पाठवले होते. तमन्ना भाटियाने HPZ ॲपवर IPL पाहण्याची जाहिरात केली होती. या अ‍ॅपच प्रमोशन केल्याचा आरोप तमन्नावर आहे. तपास यंत्रणेने बोलावल्यानंतर तमन्ना तिच्या आईसोबत गुवाहाटीला पोहोचली होती.


याआधीही बेटिंग ॲपमध्ये प्रमोशनसाठी अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी महादेव ॲप प्रकरणात अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. या ॲपच्या जाहिरातींमध्ये रणबीर आणि श्रद्धा दोघेही दिसले होते. या ॲपमुळे रणबीर आणि श्रद्धाशिवाय कॉमेडियन कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांनाही बोलावण्यात आले होते.

Web Title: Tamannaah Bhatia gets questioned by ED in Guwahati over Mahadev betting app case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.