या अभिनेत्यासाठी तमन्ना भाटिया तोडणार ‘नो किसींग पॉलिसी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 03:13 PM2020-03-11T15:13:37+5:302020-03-11T15:16:41+5:30

तमन्नाची एकच ‘तमन्ना’...

Tamannaah Bhatia Says She'll Bend No-Kissing Rule Only For Hrithik Roshan | या अभिनेत्यासाठी तमन्ना भाटिया तोडणार ‘नो किसींग पॉलिसी’

या अभिनेत्यासाठी तमन्ना भाटिया तोडणार ‘नो किसींग पॉलिसी’

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच तमन्ना ‘क्वीन’ या बॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

फिल्मी दुनियेत स्वत:चे स्थान टिकवून ठेवणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. आता दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाचेच बघा. होय, कधीकाळी साऊथ इंडस्ट्रीची आघाडीची नायिका असलेल्या तमन्नाकडे आता म्हणे निर्माता-दिग्दर्शकांनी पाठ फिरवली आहे. अनेक हिट सिनेमे देऊनही आज तिच्याकडे काम नसल्याचे कळतेय. अर्थात थांबला तो संपला. तमन्नाही हे मानणा-यांपैकीच एक़ हार मानायला ती तयार नाही. पण हो, एका अभिनेत्यासाठी स्वत:ची ‘नो किसींग पॉलिसी’ तोडायला मात्र तयार आहे.

अलीकडे एका मुलाखतीत खुद्द तमन्नाने हा धक्कादायक खुलासा केला. तुझे स्वयंवर झालेच तर तू कोणत्या 3 अभिनेत्यांना यासाठी बोलावशील? असा प्रश्न यावेळी तमन्नाला विचारण्यात अला. या प्रश्नाला उत्तर देताना तिने अभिनेता हृतिक रोशन, विकी कौशल आणि प्रभास या तिघांची नावे घेतली.

केवळ इतकेच नाही तर ‘मी नेहमीच ऑनस्क्रिन नो किसिंग पॉलिसी फॉलो करते. माझ्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये हे लिहिलेले असते. पण  मला हृतिक रोशनसोबत एखादा सिनेमा करायला मिळाला तर मी ही पॉलिसी तोडू शकते,’ असेही तिने सांगितले. 
तमन्ना ही हृतिक रोशनची डाय-हार्ड फॅन आहे. याआधीही अनेकदा तिने हे सांगितले आहे. 


२००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘चाँद सा रोशन चेहरा’ या सिनेमातून तमन्नाने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला. सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला. 
लवकरच तमन्ना ‘क्वीन’ या बॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. ‘दॅट इज महालक्ष्मी’ असे या रिमेकचे नामकरण करण्यात आले आहे. पण अद्यापही या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. ‘बोले चूडिया’ या हिंदी सिनेमातही ती झळकणार आहे. 

Web Title: Tamannaah Bhatia Says She'll Bend No-Kissing Rule Only For Hrithik Roshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.