भरकार्यक्रमात एकमेकांना मारली मिठी, डेटिंगच्या चर्चेदरम्यान पुन्हा भेटले तमन्ना भाटिया-विजय वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:30 PM2023-01-16T12:30:37+5:302023-01-16T12:46:12+5:30

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा हा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Tamannaah Bhatia vijay varma rumoured couple meet again in award show watch video here | भरकार्यक्रमात एकमेकांना मारली मिठी, डेटिंगच्या चर्चेदरम्यान पुन्हा भेटले तमन्ना भाटिया-विजय वर्मा

भरकार्यक्रमात एकमेकांना मारली मिठी, डेटिंगच्या चर्चेदरम्यान पुन्हा भेटले तमन्ना भाटिया-विजय वर्मा

googlenewsNext

Tamannaah Bhatia-Vijay Varma Video: बी-टाऊनमध्ये रोज नव्या सेलेब्सच्या जोड्या जमत असतात.सध्या बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia) आणि अभिनेता विजय वर्मा(Vijay Varma) हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. विजय आणि तमन्ना न्यू सेलिब्रेशनमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया  यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आता तमन्ना आणि विजयचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

तमन्ना आणि विजय वर्माचा लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल 
अलिकडेच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ऐले अवॉर्ड्स सोहळ्यादरम्यान भेटले. या दरम्यानचा एक लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तमन्ना भाटिया स्टायलिश ब्लू कलरच्या थाई-हाई स्लिटमध्ये सुंदर दिसत आहे. विजय वर्मा फंकी लूकमध्ये दिसत आहे. 

यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. एवढेच नाही तर नंतर दोघेही एकाच जागी बसून फोटोशूट करताना दिसतायेत. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या या लेटेस्ट व्हिडिओने त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांना खतपाणी घातले आहे. 

नव्या वर्षाचं स्वागत तमन्ना (Tamannaah Bhatia) आणि विजय (Vijay Varma) ने गोव्यात एकत्र केलं. त्यांच्या व्हायरल झालेल्या किसिंग व्हिडिओनं दोघांचं नातं कंन्फर्म केलं. दोघांनीही यावर अद्याप कोणतीच कमेंट  केलेली नाही.
 

Web Title: Tamannaah Bhatia vijay varma rumoured couple meet again in award show watch video here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.