तमन्ना भाटियाचं 'कावला' गाणं हिंदीत होणार लवकरच रिलीज!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 07:24 PM2023-07-25T19:24:50+5:302023-07-25T19:25:09+5:30
Tamannah Bhatia : भारतीय शकीरा ही पदवी मिळविणारी भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'जेलर' या बहुप्रतिक्षित चित्रपटातून 'कावला' या गाण्यामधून चर्चेचा विषय ठरतेय.
'डार्लिंग्स' अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) आणि 'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच दोघे 'लस्ट स्टोरेज २'मध्ये एकत्र दिसले होते, त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. याशिवाय तमन्ना तिचा आगामी चित्रपट जेलरमधील कावला गाण्यामुळे चर्चेत आली आहेय
भारतीय शकीरा ही पदवी मिळविणारी भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'जेलर' या बहुप्रतिक्षित चित्रपटातून 'कावला' या गाण्यामधून चर्चेचा विषय ठरतेय. चार्टबस्टर तमिळ गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकल्या नंतर आता हे गाणं हिंदीत येणार आहे. तू आ दिलबरा हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. UFO Moviez ने उत्तर भारतासाठी जेलरचे हिंदी गाणं लवकरच येणार आहे. यानंतर लगेचच सन पिक्चर्सने सनसनाटी अनिरुद्ध-रचित ट्रॅकची हिंदी आवृत्ती लॉन्च करण्याची घोषणा केली. तू आ दिलबरा चे हिंदी गीत रकीब आलम यांनी लिहिले आहे तर सिंधुजा श्रीनिवासन यांनी ते गायले आहे.
इंस्टाग्रामवर हे गाणं लॉन्च झाल्यापासून ते अल्पावधीत ट्रेंडिंग गाण झालं आहे. हजारो वापरकर्त्यांनी तमन्ना च्या हूक स्टेप ने गाण्याला अनोखं प्रेम दिलं. कावलाचा गीतात्मक व्हिडिओ देखील YouTube वर तब्बल 50 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे. तू आ दिलबरा या गाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. जेलर व्यतिरिक्त तमन्ना भाटियाकडे अनेक एक मनोरंजक प्रोजेक्ट्स लाइनअप आहेत.मल्याळममध्ये बांद्रा, तेलुगुमध्ये भोला शंकर आणि तमिळमध्ये अरनमनाई 4 यातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.